________________
प्रकरण ९ : संधिविचार
१६५
३) पद्यात : अ) पद्यात पुष्कळदा ए व ओ पुढे पुढील अ चा लोप होतो.१
ए पुढे : फासे हियासए (अहि), आसीणे णेलिसं ('अणेलिस), सीसं से भितावयंति (अभि) से णुतप्पइ (अणु), इमे + अलंकारा = इमेलंकारा, जे + अभिमुहं = जे भिमुंह, लच्छाए + अभिग्गहो =लच्छीए भिग्गहो ओ४ पुढे : तिप्पमाणो हियासए (अहि) इणमोब्बवी (अब्बबी) बालो वरज्झई (अव), एक्को त्थि (अत्थि), सूरिणो भिमुहं (अभि), सुन्नमणो
णुट्ठाणं (अणु) कुणइ५. आ) पद्यात कधी कधी इतर स्वरापुढेही पुढील अ चा लोप होतो. आ पुढे : पज्जिज्जमाणाट्टतरं (अट्ट,) इ पुढे : चिट्ठति भितप्पमाणा (अभि°), सूलाहि भितावयंति (अभि°) जावंति
विजापुरिसा (अविज्जा ), चत्तारि भोज्जाइं (अभोज्जाई) ई पुढे : वेयरिणी भिदुग्गा (°अभि°) नदी भिदुग्गा (°अभि°) उ पुढे : दोसु भिग्गहो (अभि°) अनुस्वारापुढे : कहं भितावा (अभि°) वेयरणिं भिदुग्गं (अभि°) वयणं भिउंजे
१४४निपात (लघु अव्यये) अ) अपि : एखाद्या पदापुढे अपि आल्यास अपि मधील आद्य अ चा लोप
विकल्पाने होतो (पदादपेर्वा। हेम १.४१) १) तं पि, किं पि, कहं पि, केण वि.
१ संस्कृतमध्ये ए, ओ, पुढे अ चा लोप होतोच. २ सुपास. ५१०, ५२६, ६२७ ३ कधी कधी गद्यातही ओ पुढे अ चा लोप झालेला आढळतो : णमो त्थु
(अत्थु), 'अत्थओ वगच्छिरूण (अव), अत्तणो णुग्गहट्ठाए (अणु' ), अप्पणो वगाराय (अव) (अपकाराय), लक्खणओ वगच्छामि (अव)
(समरा, पृ. १९९, ६२५, ७८९, ५४५) ४ सुपास. ६३८, ५३९, ५६८