________________
१३४
अर्धमागधी व्याकरण
आ) सवर्णलोप :
मूळ संस्कृत शब्दात अथवा वर्णान्तरित शब्दात एकच वर्ण अनेकदा आल्यास त्यातील एकाचा लोप होतो. याला सवर्णलोप म्हणतात.
१) मूळ संस्कृतशब्दात : एवमेव = एमेव, अपररात्र = अवरत्त
२) वर्णान्तरित शब्दात : हृदय = (हियय) हिय, सिचय = (सियय) सिय, (वस्त्र) अनायतन = (अणाययण) अणायण (वाईट स्थान), दन्तपवन = (दंतववण) दंतवण (दातशुद्धि)
१२५ अन्त्यवर्णलोप
कधी शब्दातील अन्त्यवर्णाचा लोप होतो. त्याला अन्त्यवर्णलोप म्हटले आहे. लोप होणारा वर्ण प्रायः व्यंजन असतो. क्वचित् स्वरयुक्तव्यंजन (अक्षर) असते. १) मनाक्-मणा, सुहृद् = सुहि, जगत् = जग, जन्मन् = जम्म, दण्डिन् =
दंडि, तमस् = तम, हविस् = हवि, धनुस् = धणु २) इति२ = इ
१२६ वर्णविपर्यय __ जेव्हा एखाद्या शब्दातील दोन वर्णांच्या (वा अक्षरांच्या) स्थानांची परस्पर४ अदलाबदल होते. तेव्हा 'वर्णविपर्यय'५ होतो.
वाराणसी = वाणारसी (बनारस), उपानह् = (वाणहा) वाहणा, दीर्घ = (दीरह) दीहर, महाराष्ट्र = (महारट्ठ) मरहठ्ठ, ललाट = (निलाड) निडाल (म.
१ म. : नववर-नवरा, अपररात्र-अपरात्र, अपरात, दंतावन-दातवण २ अन्त्य असंयुक्तव्यंजन विकार, परि. ७१ पहा ३ वैद्य पृ. २१ ४ म. चिकटणे, चिटकणे, नुकसान, नुसकान, लघु (लहु) हळु, तिलक
टिकली, अनसूया = अनुसया, फलाहार - फराळ. ५ वर्णविपर्यय याला स्थितीपरिवृत्ति असेही नाव आहे.