________________
अर्धमागधी व्याकरण
मांस = मास, मंस, मांसल = मासल, मंसल, पांसु = पासु, पंसु, कथम् = कह, कहं, इदानीम् = इयाणी, इयाणिं, संमुख = समुह, संमुह
१२२ आदिवर्णागम
एखाद्या शब्दाच्या आदि- प्रायः उच्चाराच्या सुलभतेसाठी एखाद्या वर्णाचा आगम होतो. त्याला आदिवर्णागम म्हटले आहे.
शब्दाच्या आदि येणारा हा वर्ण स्वर वा व्यंजन असू शकतो. (अ) १स्वर : स्त्री = इत्थी, स्त्री-का = इत्थिया (आ) व्यंजन : (१) ज् : एव = जेव २) प् : इव = पिव ३) म् : इव = मिय ४) व् : इव = विय, विव, उक्त = वुत्त, उच्यते = वुच्चइ, उह्यते = वुब्भइ,
ऊढ = वूढ ५) ह : ओष्ठ = हु?, अरे२ = हरे
१२३ आदिवर्णलोप ___शब्दातील आदिवर्णाचा कधी कधी लोपर होतो. त्याला आदिवर्ण लोप म्हटले आहे. हा लोप पावणारा आदिवर्ण स्वर वा व्यंजन असू शकतो.
१
२
अ) येथे शब्दातील आद्य जोडाक्षर उच्चारात टाळून उच्चारसौंदर्य साधले जाते. आ) म. स्कूल-इस्कूल, स्टेशन-इस्टेशन, एक = योक, येक अ) पिशेलच्या मते (इं. पृ. २३५) हरे' हे अव्यय 'अरे' च्या मागे ह् येऊन झाले आहे. आ) म. ऑफिस-हफिस, अल्फांसो - हपूस, ऑफिसर-हफीसर, हिंदी : ओष्ठ- होठ म. शिथिल-ढिला, अमंगल - वंगाळ, उपरि-वर, बुभुक्षा-भूक, अभ्यंतरभीतर. लोप पावणारे हे स्वर प्रायः अ, इ, उ हे आढळतात.
३
४