________________
प्रकरण ७ : भाषाशास्त्रीय वर्णादेश
१२७
ठेवतात. जोडाक्षर नाहीसे करण्याच्या या पध्दतीला सुलभीकरण' असे म्हणतात.२ उदा. मिश्र = मिस्स = मीस.
संयुक्तव्यंजनातील एक अवयव अंतस्थ (य, व्, र्, ल्) अथवा उष्म (श्, ष, स्) असता प्रायः सुलभीकरण केलेले आढळते.
अ) एक अवयव अंतस्थ असता : १) य् असता : गव्यूत = गाऊय (कोस) २) र् असता : दुर्भग = दूहव, कर्तव्य =कायव्व, निर्णयति = नीणेइ. ३) ल् असता : वल्कल = वागल (म :वाकळ), फल्गुन = फागुण
(फाल्गुन), वल्क = वाग (वल्कल) ४) व् असता : जिह्वा = जीहा
आ) एक अवयव ऊष्म असता : १) श् असता : मनःशिला = मणासिला, दृश्शासन = दुसासण, निःशङ्क
___ = नीसंक, निःशेष = नीसेस । २) ष असता : आदक्षिण = आयहिण, दक्षिण = दाहिण, प्रदक्षिण =
पयाहिण, निष्षिक्त = नीसित ३) स् असता : उत्सव = ऊसव, भस्मन = भास, निस्सह = नीसह, दुस्सह
= दूसह
इ) अंतस्थ व उष्म असा योग असता.३
१ काहीजण सुलभीकरणाला 'केवलीकरण' म्हणतात. ___ मराठीत ण्ण चे सुलभीकरण होऊन न होतो. कर्ण - कान, पर्ण-पान,
अरण्य-रान. मराठीतील इतर उदाहरणे : वर्ण-वाण, पुत्र-पूत, गर्भ-गाभा, अद्य-आज, पृष्ठ-पाठ, मुद्ग-मूग, दुग्ध-दूध, तक्र-ताक, चक्र-चाक, जिह्वा-जिब्भा-जीभ, हस्त-हात, अस्ति-अत्थि-आथी, कार्य-काज,
श्वश्रू-सासू, कर्तरी-कातरी, पत्र-पात. ३ लुप्तयरवशषसां शषसां दीर्घः। हेम १.४३