________________
प्रकरण ७
भाषाशास्त्रीय वर्णादेश
888888888888888888888888888888888888888888888888888888
११५ प्राथमिक
परिच्छेद ८२ मध्ये म्हटल्याप्रमाणे संयुक्तव्यंजनाच्या बाबतीत कधी कधी स्वरभक्ति, सुलभीकरण इत्यादींचा अवलंब केला जातो. आता हे व इतर काही वर्णादेश यांचा विचार करावयाचा आहे.
११६ स्वरभक्ति
मध्ये स्वर न येता अनेक व्यंजने एकत्र येऊन जोडाक्षर बनलेले असते. आता जर त्या व्यंजनामध्ये एखादा स्वर अधिक घातला तर आपोआपच संयुक्त व्यंजन नाहीसे होईल. उदा. अग्नि = अ+ग्+न्+इ येथे ग् व न् मध्ये अ हा स्वर अधिक घातला अ+ग्+अ+न+इ तर अगनि-अगणि होऊन संयुक्तव्यंजन लुप्त होईल. अशात-हेने जोडाक्षरातील व्यंजनांच्या मध्ये एखादा स्वर अधिक घालून संयुक्त व्यंजन टाळण्याच्या पध्दतीला स्वरभक्ति' असे नाव आहे.
कधी कधी शब्दातील आद्य तर कधी मध्य संयुक्तव्यंजन टाळण्यास स्वरभक्तिचा उपयोग होतो.
संयुक्तव्यंजनातील एक अवयव जेव्हा अनुनासिक (ण, न्, म्) किंवा अंतस्थ (य, व्, र्, ल्) असतो तेव्हा प्रायः स्वरभक्तिचा अवलंब केला जातो. तसेच ह्र व ह यांचे बाबतीतही बहुधा स्वरभक्ती होते.
स्वरभक्तिने प्रायः इ व पुष्कळदां अ आणि उ हे स्वर येतात क्वचित् इतर स्वरही येतात. केव्हा कोणता स्वर येईल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. ते
१ विकर्ष, विप्रकर्ष, विश्लेष या संज्ञानीही स्वरभक्तीचा निर्देश केला जातो.