________________ 7) प्राचार्य श्री.शिवाजीराव भोसले डॉलुंकड यांनी केलेली सामायिक मीमांसा कौतुकास्पद आहे.शुध्द आत्मतत्वाचे ध्यान हाच खरा योग .पण हे ध्यान सहज करता येत नाही. त्याला कधी आर्तध्यानाची तर कधी रौद्रध्यानाची अवकळा येते. या ध्यान प्रक्रियेचे शुध्दिकरण घडावे व धर्मध्यानातून शुक्लध्यानात ते विकसित व्हावे ही अपेक्षा असते. कायोत्सर्ग व धर्मध्यान हाच साम्यवस्थेचा मार्ग आहे अशी डॉक्टरांची धारणा आहे.. पारंपरिक व प्रचलित सामयिक पध्दतीचा परामर्श घेउन , पंचमकालात वाढीस लागलेल्या काही त्रुटिंकडे डॉक्टर लुंकड यांनी लक्ष वेधले आहे. ही लहानशी पुस्तिका हा सामायिकाचा सुलभ अन्वयार्थ आहे. - शिवाजीराव भोसले फलटण