________________
४२० ]
अध्याय तेरहवां । । व्याख्यानालय, सभामंडपा, जिनकन्याशाला ।
श्राविकाश्रमा स्थापुनि केल्या संस्कृत जिनबाला ॥ विद्यार्जनार्थसाह्य देउनी तुष्टविले छात्रां । __ भाविक सुजना सवें घेउनी भूषविल्या यात्रां ॥ निखिल भारत जैन जनपद परिचय-ग्रंथाला ।
श्रमुनी केलें पूर्ण 'दिगंबर जैन डिरेक्टरिला' ॥ स्थापियले त्या विद्वद्-खचिता काशिपुरिमाजी ।
'स्याद्वाद महाविद्यालय' जिनवाणो ती गाजी ॥ प्रामाणिक माणिक आणिक या लोकं न नर कोणी ।
जे. पी. पदवी अपि तयाते अवनिपाल वाणी ॥ शांत, सरल, अतिप्रेमळ सर्वप्रिय नच लव मानी ।
आप्त, जाति, साधर्मि, देशजन स्वकीय स्वच मानी । करुनी स्वोन्नति, जात्युन्नति, धर्मोन्नति देशाची ।
सेवा करुनी मेवा मिळवी ठेवचि पुण्याची ॥ यापरि वेंचुनि कायावाचामने धनें आयु ।
विद्याहाराभयभेषजदाने हो चिर-आयु ॥ झाले सुरवर माणिक स्वर्गी गेले वां मोक्षीं । शांत जाहला तदीय आत्मा सुकृते ती साक्षी ॥१॥
(चाल-आज अक्रुर हा) अजि अवचित हा जैनसुकृतनिधि सरला ।
माणिक्यचंद्र मावळला ॥ ध्रु० ॥ ती प्रेमाची धर्मचंद्रिका साची ।
जाहली नष्ट की अमुची ॥ जिनवाणीचा मेघाच बोधसुधेचा ।
वितुळला जैनवृंदाचा । चाल || भरविल धर्मसभा कणि आतां ।
Jain Education International
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org