________________
४३८ ]
अध्याय दशवां ।
मुदं दधानो मिषतां जनानां चन्द्रोज्ज्वलां पुण्यप्रभां तनोषि ॥ धातोश्वरर्थमकारि सार्थस्तेनात्र लोके प्रथितोऽसि चन्द्रः ||४||
श्रेष्ठिवर्य महाशय !
हल्ली या शहरांत चालू असलेल्या उत्सवाचे व परिषदेच अनुरोधाने आपण येथे येण्याची आम्हांवर मेहेरबानी करून आमच्या जैन समाजावर जो अनुग्रह केला आहे, त्या प्रसंगाचा फायदा घेऊन आपल्या समाज विषयक पुण्यशाली सत्कृत्त्याबद्दलच्या पूज्यताजनित प्रेमाला शब्दरूप देण्याचा यत्न करण्याची आम्हांस उत्कंठा झाली आहे व ती पूर्ण करून घेण्याची आपण परवानगी द्याल अशी उमेद आहे.
भरतखंडांत जैनधर्माची प्रभा वारंवार उज्ज्वल करावयासाठी ज्या विभूति आमच्यामध्ये जन्म पावल्या आहेत त्याच्य सन्मान मालिकेत अधिष्ठित करावयासारखे सत्पुरुष आपल्यारूपाने आमच्या कालांत जन्मले आहेत हे आमच्या समाजाच्या पुण्योदयाचेच लक्षण आहे, असे प्रत्येक जैनास बाटत आहे.
हें उंचस्थान भारतीय जैन समाजाच्या एक मताने प्राप्त होण्यासारखी अनेक सत्कृत्यें आपण केलीं आहेत हें सर्व विश्रुत आहेच. आपल्या अनुपम औदार्यामुळे आमच्या समाजांतील बहुतेक मोठ्या संस्था आज पोशिल्या जात आहेत; इतकेंच नव्हे तर मुंबई, कोल्हापुर, अहमदाबाद, आगरा, वगैरे ठिकाणच्या विद्याग्रहासारख्या उत्तम संस्था या आपल्या थोर दानवीर्यापासूनच जन्मल्या आहेत. मागासलेल्या जैनजातीची उन्नति करणाच्या आपल्यासारख्या आमच्या समाजांतील थोड्या विभूतींचे जैन समाजावर
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org
Jain Education International
-