________________
३७० ]
अध्याय नवाँ
त्यांस उपदेश करून आणि त्यांजविषयीं प्रेम बाळगून या प्रांतांतील जैन समाजांत जी किंचित् विद्यावृद्धि होत आहे त्याचें बरेंच श्रेय आपल्यास आहे. पाऊण लाख रुपये खर्चून आपण जे विद्यालय मुंबईस जैन विद्यार्थ्याकरितां बांधिले आहे त्या योगान चिरकाल आमच्या समाजास फायदा होईल यांत शंका नाहीं.
आपल्या दानशूरतेची उदाहरणे देण्याचे कांहीं कारण नाहीं. तथापि इतके म्हटल्या शिवाय आह्मांस राहवतच नाहीं कीं हिंदुस्था नांतील लक्षावधि जैन लोकांत आपण या गुणाने केवळ अद्वितीय आहां. ज्यांच्या औदार्याची सर्व देशभर पसरलेली मनोहर स्मारके जैनांच्या धार्मिकतेची साक्ष जगास देत आहेत त्या माहात्म्याचा पुण्यश्लोक मालिकेत आपणांस गणण्ययास बिलकूल हरकत नाहीं.
जैन लोकांची सर्व प्रकारे उन्नती व्हावी; त्यांची स्थिती ऊर्जित व्हावी; व्यापारांत, शिक्षणांत व धार्मिकर्तेत त्यांना यश मिळत जावे; या चिंतेंत आपण सर्वदा व्याष्टत आहां व या उद्देशानें आपण प्रत्येक धार्मिक चळवळीस उत्तेजन देत आहा. याबदल आपले अभिनंदन करून श्री जिनेश्वरकृपेने या आपल्या सदुद्योगांत आपणांस अखंड सिद्धि मिळों अशी आह्मीं प्रार्थना करितों. तसेंच जैनसमाजाच्या उद्धारासाठी असेंच यत्न पुढेही चालविण्यास आपल्यांस जिनेश्वर देवोंत अशी ही आमची विनवणी आहे.
आपले
श्री क्षेत्रस्तवनिधि | A. P. Chaugule B. A. LI ता १८ जानेवारी १९०४ ई०
A. B. Latthe M. A.
&c. &c.
Jain Education International
For Personal & Private Use Only
B.
www.jainelibrary.org