________________
२१८
"आपले गांवी आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी व महाशिवरात्री या तोनही दिवशी कोणाचे ही घरी मांस भक्षण होत नाही, तरी या पुढे सुध्धां वरील तीनही दिवशी कोणत्याही इस्माचे घरी मांस भक्षण केले जाणार नाही, याची आपण सर्वानी दक्षता घ्यावी" सूचक धोंडू भीका पाटील अनुमोदक हिमतराव जगतराव पाटील ठराव सर्वानुमते मंजूर सही xxx
___ सरपञ्च ग्रामपञ्चायत, दहिवंद, ता अमळनेर जि, जलगांव ग्रामपंचायत कमेटी मुकटी ता. धुळे जि. धुळे ।
तारीख २६-५- १९६५ ___ ग्रामपंचायत सभासदः-१) म. पोपटराव गोविंद राब पाटील (सरपंच) २) श्री बाबुराव बळीराम पाटील (उपसरपञ्च) ६) श्री भिकचन्द गुलाबचन्द जैन (सभासद) ४) श्री गरबड वंजी पाटील ५) श्री माना तुलसीराम पाटील ६ श्री माणिक दगा देवरे ७ श्री रामदास रघुनाथ कुलकर्णी ८ श्रीमती भागाबाई भ्र. परशराम पाटील ९ श्री पुंडलिक धर्मा साळुके १० श्री भाऊराव वामनराव पाटील ११ श्री आत्माराम तापीराम पाटील १२ श्रीमती चापावाई भ्र. उषा लोहार १३ श्री पुण्डलीक झिपरु पाटील १४ श्री त्र्यंबक गंगाराम पाटील १५ श्री माधवराव महारु पाटील
श्री पूज्य कन्हैया लालजी महाराज यां चेसेवेसी, __ आपल्या इच्छेप्रमाणे मुकटी येथील ग्रामस्था तर्फे आमच्चा गांवाच्या पश्चिम बाजूला जी कन्हेरी नदी दक्षिण-उत्तर वाहते त्या नदीवर मासे धरण्या साठी आमच्या हद्दीपर्यंत कोणासही बंदी राहिल, व तसे कृत्य कोणासही करु देणार नाहीत सदरचे निवेदन आम्ही सर्व गांवातर्फे सादर करीत आहोत, गांवात कोणत्याही प्रकारचा जातिभेद अगर धर्म भेद नाहीं
तसेच नव बौध्धांना सार्वजनिक ठिकाणी पाणी वगैरे भरण्याची मोकळिक आहे, तसेच कन्हेरी नदीचे पाण्यात कोणीही मासे धरु नये म्हणून गांवचे हद्दीत ठिकठिकाणी ही बोर्ड लावण्यात आलेले आहेत, गांवात खाटीक असून सर्व धर्मीय सन, एकादशी, श्रावणमास, हनुमानजयन्ती, रामनवमी, गणेश चतुर्थी, गोकुलअष्टमी, असे उत्सव मानले जातात त्या दिवशी कोण्यत्याही प्रकारची जीव हत्या करीत नाहीत व वरील प्रमाणे शुभ धार्मिक विधि केले जातात आपले नम्र ग्रामस्थ मंडली मुकटी ता धुळे सरपञ्च ग्रामपञ्चायत मुकटी ता, धुळे
ता. १- १- १९६५ ग्रुप ग्रामपञ्चायत कमेटी गणपूर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ता. चोपडे
श्री पूज्य कन्हैयालालजी महाराज यांचे सेवेसी सरपञ्च, ग्रुप ग्रामपञ्चायत गणपुर ता, चोपडे जि जलगांव याजकडूनः
आपल्या इच्छेप्रमाणे गणपूर येथील ग्रामस्थातर्फे आमच्या गांवाच्या उतरेस अनेर नदी असून तिच्या कांठावर महादेवचे देऊळ आहे, अनेर नदीवर आमच्या हद्दीतील पात्रांत कोणासही मासे धरणेसाठी मनाई आहे काठावर महादेवाचे देऊल आहे अनेर नदीवर आमच्या हद्दीतील पात्रांत कोणासही मासे धरणेसाठी मनाई राहील व तसे कृत्य आम्ही कोणासही करु देणार नाही व वरील सूचनेचे आम्ही काठावर बोर्ड लावून ठेवू, सदरचे निवेदन आम्ही सर्व गांवातर्फे सादर करीत आहेत, गांवांत कोठल्याही प्रकारचा जाति भेद अगर धर्म भेद नाहीं , तसेंच नवबौध्धांना सार्वजनिक ठिकाणी पाणी वगैरे मोकळीक आहे ,
गावांत खाटीक असून सर्व धर्मीय सन एकादशी, श्रावणमास, हनुमानजयन्ती, गणेशचतुथीं, रामनवमी, गोकुलअष्टमी असे दिवस पूर्वीपासून पाळले जात आहेत , दरंबर्षी आषाढी एकादशी पासून धार्मिक पोथी पुराण चार महिनें पर्यन्त चालू असते , दरवर्षी रामनवमीच्या दिवशी हरीनाम सप्ताह ७ दिवसांचा
For Personal & Private Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org