________________
( ५७ )
या दोन अवस्थेत आत्मा एक आहे. एकाच आत्म्याच्या या दोन अवस्था आहेत. तोच मी आहे असें जें ज्ञान होतें तें अभेद ज्ञान होय. ज्या मनुष्यास काल मी पाहिले तोच हा मनुय आहे. या वाक्यांत त्या मनुष्याचा कालच्या व आजच्या अवस्थेतील एकपणा आपणास दिसून येईल. अशा एकत्व दाखविणाशनास अभेद ज्ञान असें ह्मणतात. ही दोन ज्ञानें खोटी नाहीत. कारण पदार्थामध्ये भेद अभेद हे आपणास स्पष्ट दिसतात ह्मणून हीं दोन ज्ञाने सत्य आहेत. वस्तूमधील एकपणा व अनेकपणा हे परस्पर सम्बद्ध आहेत यांचा अविनाभाव आहे. वस्तूमध्ये एकत्व नाहीं मानले तर अनेकत्व देखील सिद्ध होऊ शकत नाहीं, जमें अग्निच्या अभावी धुराची उत्पत्ति बिल कुल होऊं शकत नाहीं तद्वत् एकत्वाच्या अभावी अनेकत्व राहू शकत नाहीं व अनेकत्वाच्या अभावी एकत्व राहू शकत नाहीं. यास दुसरें एक उदाहरण असे आहे की स्त्रीला पति असेल तरच तिच्या ठिकाणी पत्नीत्व राहू शकतें व पुरुषासही पत्नी असेल तरच त्याच्यांत पतिपणा येतो. ह्मणजे पतित्व किंवा पत्नीत्व स्त्रीपुरुषाश्रित आहे; तसेंच एकत्व अनेकत्वावर अवलंबून आहे व अनेकत्व एकत्वावर अवलंबून आहे. या दोन धर्मापैकी एकच मानला तर दुसऱ्या धर्माचा अभाव होतोच; परन्तु त्याबरोबर जो धर्म आपण मानला आहे, त्याचा देखील अभाव होतो. व धर्माचा अभाव झाल्यावर वस्तू निःस्वभाव झाल्यामुळे तिचे शब्दांनीं वर्णन होऊं शकत नाहीं, यामुळे ती अवाच्य होईल. कोणताच स्वभाव जर वस्तुमध्ये नाहीं तर तिचें वर्णन तरी कसे करतां येईल. यास्तव वस्तु एकानेक धर्मात्मक आहे असे मानले पाहिजे. तसेच भेदाभेदात्मक ज्ञानही खरें मानले पाहिजे. जीवादि द्रव्यामध्ये आपणांस अनेक
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org