________________
( ४८ )
तृप्ति होत नाहीं. कारण, जोपर्यन्त सुखसामग्री आहे तोपर्यन्त देह व आत्मा यांना सुख होतें. व त्यांचा अभाव झाला ह्मणजे पुनः देह व आत्मा यांना दुःख भोगावें लागतें. तात्पर्य, इन्द्रियजनित सुखामध्ये देह व आत्मा यांना कायमचें सुखी करण्याची शक्ति नाहीं. याचे कारण हें आहे की इन्द्रियजन्य सुखच मुळीं टिकाऊ नाहीं. तेव्हां तें आत्म्याला व देहाला कायमचे सुखी कसे करूं शकेल ? यामुळे भोज्य पदार्थ व इंद्रियजन्य स्पर्शादि सुख यापासून आत्मा व देह यांच्यावर कोणताच उप-कार होत नाहीं असा भगवान् अभिनंदन तीर्थकरांनी आपल्या - सर्व भव्यांना आपल्या मधुर व हितकर वाणीनें उपदेश केला. भावार्थ:- इंद्रियजन्य सुखामध्ये पूर्ण तृप्ति करण्याची श क्तिच नाहीं. तें सुख वरचेवर इच्छेला उत्पन्न करते. जरी इंद्रियजन्य सुखापासून थोडासा आनंद मिळतो तरी तो लौकरच विलयाला जाऊन दुःखाचा भडका होतो. जसें, खरूज किंवा गजकर्ण खाजविण्यामध्ये प्रथमतः आनंद वाटतो परंतु जेव्हां आंतून रक्त निघू लागतें त्यावेळेस तो सारा आनंद पार नाहीसा होतो व दुःसह वेदना होऊं लागतात. याचप्रमाणे विषयोगांचा अनुभव घेतांना सुख झाले तरी त्यापासून परिणामी दुःखा दत्त अणून पुढे उभे राहते. संसारिक सुख वास्तविक दुःख आहे. कारण, हें आत्म्यापासून उत्पन्न झालेलें नसतें, कर्मजन्य आहे. याचा उपभोग घेतेवेळेस अनेक संकटे येतात. हे कर्मबन्धास कारण आहे. यामुळे याला दुःखच झटलें पाहिजे. याच आशयाची प्रवचनसार ग्रंथामध्ये एक गाथा आहे. ती अशी:
--
सपरं बाधासहियं विच्छिण्णं-बन्धकारणं विसमं ।
जं इंदियेहि लद्धं तं सुक्खं दुक्खमेव तहा ॥ १ ॥
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org