________________
ये कर्मकृता भावाः परमार्थनयेन चात्मनो भिन्नाः । ....
तत्रात्माभिनिवेशोऽहंकारोऽहं यथा नृपतिः ॥२॥ . ___ अर्थ:-बिलकूल आत्म्यापासून भिन्न असलेल्या शरीर स्त्री मित्र पुत्रादि पदार्थामध्ये, जे पुण्योदयाने प्राप्त झाले आहेत त्यामध्ये हे माझे आहेत अशी कल्पना होते. या कल्पनेला म-' मत्व ह्मणतात. जसे हा माझा देह आहे. ही माझी बायको आहे. इत्यादि.
तसेंच शुभकर्माच्या उदयाने उत्पन्न होणाऱ्या पर्यायाम ध्ये अहंबुद्धि उत्पन्न होते. निश्चयनयाने पाहिले असतां कमजन्य भाव-पर्याय आत्म्यापासून अगदीच वेगळे आहेत. त्यांचा आत्म्यांशी बिलकुल संबंध नाही. तथापि आत्मा मोहवश हो. ऊन त्यामध्ये अहंबुद्धि धारण करतो. जसे, मी राजा आहे. यांस अहंकार ह्मणतात. आता येथे राजेपणा हा भाव शुभकर्मोंदयाने उत्पन्न झाला आहे. वास्तविक विचार केला असतां आत्मा राजा नाहीं, रंक नाही, काळा गोरा इत्यादि वर्णयुक्त नाही. हे आत्म्याचे स्वरूपच नव्हें. यास्तव यामध्ये जो अहंपणा उत्पन्न होतो तो खोटा आहे. यांच्या योगाने आत्म्याला बंध होतो. कारण मोहनीय कर्माच्या योगानें बंध होतो व त्या मोहास हे मिथ्याज्ञान देखील साहाय करिते. ह्मणून अज्ञानमिथ्याज्ञान हे देखील बन्धास कारण आहे. यामुळे भगवान् अभिनन्दन तीर्थकरांनी अज्ञानमूढ झालेल्या लोकांचा उद्धार करावा ह्यणून खन्या तत्वाचा उपदेश केला व त्यांचा अज्ञानांधकार दूर केला व ख-या तत्वांचे लोकाकडून ग्रहण करविलें. ... भगवानभिनन्दनस्वामी केन रूपेण तत्वमजिग्रहदित्याह। .. अभिनन्दन तीर्थकरांनी कोणत्या रीतीने खऱ्या तत्वांचे ग्रहण
.. करविले हे स्तुतिकार सांगतात.
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org