________________
(४३) प्रवृत्तमनुबिभ्रति स्वबलयोग्यमद्याप्यमी ॥
अर्थः -मुनींनी आपल्याजवळ पात्र ठेविलें तर त्यांत पिण्याचे व खाण्याचे पदार्थ बराच काल राहिल्यामुळे त्या पदार्थात सूक्ष्म सम्मूर्छन जंतूंची उत्पत्ति होते. व त्यांतून पदार्थ टाकून दिल्यास त्या सर्व जंतूंचा नाश झाल्यामुळे मुनींना हिंसेचे पातक अवश्य लागणार. कदाचित् त्या पदार्थापासून ते जंतु वेगळे केले तरी त्या पदार्थापासून पुनः सूक्ष्म सम्मूर्च्छन जंतु उत्पन्न होण्याचे रोकले जाणार नाही. यास्तव मुनि आपल्या जवळपात्र परिग्रह बिलकुल ठेवीत नाहीत. मुनि दिगंबर असतात व ते उभे राहून आजन्म पाणि पुटाहारी असतात. व हमेशा त्यांचे अंतःकरण पंधरा प्रमादांनी रहित असते. यामुळे त्यांच्या हातून हिंसा घडली तरी तिच्यापासून पातकाचा बन्ध होत नाही. झाला तरी त्यापासून सुख किंवा दुःख हे त्यांना भोगावे लागत नाही. कारण, ते यत्नाचारपूर्वक वागत असतात यामुळे हिंसेपासून काचा बन्ध झाला तरी त्यापासून दुःख होत नाही. ईपिथिक कर्माचा जरी त्यांना बंध होतो तरी त्या बन्धामध्ये स्थिति व फल देण्याची शक्ति नसते. जसे वाळलेल्या भिंतीवर दगड फेकला तरी तो त्या भिंतींत रुतून बसत नाही. परंतु तो जसा पुनः खाली पडतो, त्याचप्रमाणे इपिथि. , क कर्मामध्ये प्रकृति प्रदेश रूपानें परिणत होण्याची शक्ति असते. ते कर्म आत्म्यामध्ये फार काल टिकून रहात नाही व त्यामध्ये फलदान शक्तिही नसते. यामुळे प्रमाद रहित होऊन चारित्र धारण करीत असतात. या कलिकालामध्ये देखील आपल्या शक्तिस अनुसरून योग्य असें चारित्र मुनीश्वर धारण करितात. एवढ्या विवेचनावरून परिग्रह धारण केल्यापासून धय॑ध्यान व शुक्लध्यान हे सिद्ध होत नाही. हे व्यक्त झाले. .
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org