________________
( ४१ )
या दोहोंचा भगवंतानी आश्रय केला. व या दोन ध्यानांची सिद्धि होण्याकरितां बाह्याभ्यंतर सर्व परिग्रहांचा त्यांनी त्यान केला.
भावार्थ:- अभिनंदन तीर्थकरांनीं धर्मध्यान व शुक्लध्यानाची प्राप्ति व्हावी झणून उभय परिग्रहांचा त्याग केला. सर्व प्राण्यावर क्षमा व दयाही धारण केली. येथें परिग्रहांचा त्याग केला ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. याचे कारण हे आहे कीं परिग्रहापासून संक्लेश परिणाम होतात. इच्छा वाढत जातें व जोपर्यन्त इच्छा आहे तोपर्यन्त संसारांतून मुक्तता होणें . शक्य नाहीं. परन्तु श्वेताम्बरांनीं परिग्रह धारण केल्यापासून मुक्ति प्राप्त होते असे हाटलें आहे. परन्तु त्यांचें हें क्षणणे योग्य नाहीं. कारण परिग्रह धारण करणाऱ्या मनुष्यांचे चित्त एकाच पदार्थाकडे केव्हाही लागत नसल्यामुळे त्यांना धर्म्य व शुक्ल ध्यानाची प्राप्ति होत नाहीं. कारण, परिग्रहांनीं व्याकुलता उत्पन्न होते. परिग्रह धारण केल्यामुळे परमशुक्लध्यानाची प्राप्ति होत नाहीं व परिग्रह धारण केल्यापासून बराच त्रास सोसावा लागतो. हें विद्यानन्द आचार्यांनी एका श्लोकांत स्पष्ट रीतीनें दाखविले आहे. तो श्लोक असाः
परिग्रहवतां सतां भयमवश्यमापद्यते ।
प्रकोपपरिहिंसने च परुषानृतव्याहृती ॥ ममत्वमथ चोरतः स्वमनसश्च विभ्रान्तता ।
कुतो हि कलुषात्मा परमशुक्लसयानता ॥ १ ॥ अर्थ :-- परिग्रह बाळगणाऱ्यांना चोरापासून अवश्य भीि उत्पन्न होते. व आपल्या वस्तु चोरणाऱ्यावर अतिशय क्रोध उत्पन्न होतो. चोर सांपडला असतां आपण त्याला मारतो. परिग्रहांची प्राप्ति व्हावी, यासाठी मनुष्य खोटे देखील बोलतो.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org