________________
(४० ) पौत्समा पादपूरणे' इति द्वित्वं । अयुजयकः । केन ? नैन्ध्यगुणेनः कथम्भूनेन ! द्वयेन. बाह्याभ्यंतर परिग्रहत्यागरूपेण । अनेन श्वेतपटा। प्रत्युक्ताः । परिग्रहवां एकाग्रतालक्षणध्यानानुपपत्तेः, परिग्रहस्य व्य. ग्रताहेतुत्वग्रहात् । ..मराठी अर्थः-चौथ्या तीर्थकराचे अभिनंदन हे नांव सार्थक होते. कारण भगवान् स्वतः अंतरंग ज्ञानादि गुणांनी च बाहेरील इहलौकिक ऐश्वर्यांनी युक्त होते. एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान् अभिनंदन तीर्थकरांचा जन्म झाला त्यावेळे. स सर्व लोकांचे ज्ञानादिक गुण वाढले व ते ऐश्वर्यसंपन्न झाले. यामुळे भगवंताचे अभिनंदन हे नांव सार्थक योग्य होते. कारण, अभि झणजे सर्व बाजूंनी, सर्व त-हेनें नंदन झणजे वाढलेले ह्यणजे सर्व तन्हेनें ज्ञानादिक गुणांची व ऐश्वर्याची ज्यांनी उन्नति केली आहे असा अर्थ या शब्दाचा होतो. यामुळे त्यांचे नांव सार्थक होते. अशा भगवंतांनी क्षमा जिची प्रियसखी आहे अशा दयारूपी प्रियतमेचे पाणिग्रहण केले. यावरून भगवान् सर्व प्राणिमात्रावर दया करणारे व क्षमाशील होते. तसेच या अभिप्रायावरून सुगत, महादेव व विष्णु वगैरे देवतांना दया व क्षमा नव्हती हे सिद्ध होते. बुद्धाने जन्मल्याबरोबर आपल्या आईला मारून टाकले. यावरून तो निर्दय होता. महादेवाने त्रिपुर नांवाच्या राक्षसाची आकाशांत रचलेली तीन सुंदर शहरें जाळली. यावरून त्याचे अंतःकरण निर्दयी व अक्षमायुक्त होते हे सिद्ध होते. तसेच विष्णुनेंही पुष्कळ राक्षसांचा नाश केला. नृसिंहावतार धारण करून हिरण्यकशिपूचे वक्षःस्थल विदीर्ण केले. यामुळे या तीघांच्या ठिकाणी देवपणाला उचित असे गुण नाहीत. यास्तव यांना देव समजून यांची पूजा करूं नये. तसेंच कर्माचा नाश करण्याकरितां धर्मध्यान व शुक्लध्यान
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org