________________
( ३७ ) होईल. कारण, ते कर्म केल्याबरोबर त्याचा नाश झाल्यामुळे तो त्या कर्मापासून होणा-या सुखदुःखाचा भोक्ता होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे हिंसा एका जीवाने केली असल्यास तिच्या फलाचा भोक्ता दुसराच जीव आहे, असें मानावे लागेल. त्यामुळे 'अंधळा दळतो व कुत्रा पीठ खातो, या मणीप्रमाणे कर्ता व उपभोक्ता हे एक न मानतां भिन्न मानावे लागतील. प्रतिक्षी पदार्थाचा नाश होतो असे मानले तर जी वस्तु आपण दुसन्याला उसनी दिली तिची आठवण होणार नाही. कारण, ती दिल्याबरोबर आपला नाश झाला व मागतेवेळेस आपण नवीनच आहोत. यामुळे आपण ती वस्तु दिली नाही असें ठरेल व त्या वस्तुची आपणास स्मृति है। राहणार नाही. आपण जे शिकलो तेही लक्षांत राहणार नाही. इत्यादिक दोष उत्पन्न होतात. यामुळे बन्ध मोक्षादि पदार्थांची सिद्धि क्षणिकवादाचा स्वीकार केल्यास होत नाही. तसेंच पदार्थ सर्वथा नित्य मानले तरी बंधमोक्षादि तत्वांची सिद्धि होत नाही. यासाठी सम्भवनाथ जिने श्वगंनी कथंचिन्नित्यानित्यात्मक तत्वांचा उपदेश केला आहे. अशा रीतीने तत्वें मानली झणजे कोणताही दोष येत नाही.
स्तोता स्वात्मन औद्धत्यं परिहरन्नाह । आतां स्तुतिकार आपली लघुता प्रदर्शित करतात. शक्रोऽप्यशक्तस्तव पुण्यकतिः
स्तुत्यां प्रवृत्तः किमु मादृशोऽज्ञः ॥ तथापि भक्त्या स्तुतपादपद्मो
ममार्य देयाः शिवतातिमुच्चैः ॥ १५ ॥ शक्रोऽपीत्यादि । शक्रः इंद्रः सोपि अवधिज्ञानसंपन्नोऽपि सकलश्रुतबरोऽपि अशक्तोऽसमर्थः । कथम्भूतः ? स्तुत्यां स्तवने प्रवृत्तः सन् । .
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org