________________
(२३) अनन्त चतुष्टयरूपी लक्ष्मी ज्यांस प्राप्त झाली आहे असे, आणि अन्तरङ्ग व बाह्य शत्रुकडून जे जिंकले गेले नाहीत, तसंच ज्यांनी आपल्या आत्म्याला इन्द्रियांच्या आधीन होऊ दिले नाही असे ते पूज्य ज्ञानी अजित तीर्थकर अन्तरङ्ग अनन्त - ज्ञानादि चतुष्टय लक्ष्मी व बहिरङ्ग समवसरण लक्ष्मी ही मला प्रदान करोत. - भावार्थ-ज्याला आपल्या आत्म्याच्या स्वरूपाची प्राप्ति झाली आहे तो आत्मा निरिच्छ असतो व त्याचा उपदेश निरपेक्ष असतो त्या उपदेशापासून त्याला स्वतःला कोणताच स्वार्थ साधून घ्यावयाचा नसतो. अशा महात्म्याची कृत्ये सर्व परे। पकारार्थच होत असतात. आणि यामुळेच मित्र व शत्रु, कांचन व मृत्तिका यांच्याकडे ते समान दृष्टीनेच पाहत असतात. जसें चंदनाचे पोषण करणाऱ्या व त्यास कुन्हाडीने तोडणाऱ्या दोन्ही व्यक्तींना तो चंदन वृक्ष आपल्या सुगंधाने आनंदित करितो. याचप्रमाणे सज्जन व दुर्जन यांच्याविषयी हे आदर्श पुरुष समदृष्टि असतात. व अशा माहात्म्यांनाच अविनाशी ज्ञानादि संपत्ति प्राप्त होत असते. इन्द्रियांचा विजय अशांच्या हातूनच होत असतो. यास्तव महात्मा अजित भगवान् मला आपली ज्ञानादि संपत्ति देवोत.
याप्रमाणे द्वितीय जिनाचे स्तोत्र संपले. ह्या पांच पद्यामध्ये उपजाति छंद आहे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org