________________
(१२) खरी आहे, परंतु मोहनीय कर्माचें त्याला पाठबळ नसल्यामुळे ते आपले कार्य बजावण्यास समर्थ होत नाही. ज्याप्रमाणे मंत्रादिकांनी निर्विष केलेले विष-प्राणघातक होत नाही, त्याचप्रमाणे मोहनीय कर्माच्या अभावी असातावेदनीय आपला प्रताप दाखऊ शकत नाही, यामुळे केवलींना भूक लागत नाही हे सिद्ध होते व त्यामुळे त्यांच्या ज्ञानांत कोणत्याही तन्हेनें हीनता येत नाही, ज्या योगे त्यांच्या उपदेशांत अप्रामाण्य येईल. तेव्हां या श्लोकांतील 'बभूवच ब्रह्मपदामृतेश्वरः' हे विशेषण योग्य आहे हे सिद्ध झाले. अत्राह मीमांसको भगवतोऽतीन्द्रियज्ञानविकलतया सकलार्थपरिज्ञा
नासम्भवात्कथमञ्जसा तावत्प्रातिपादनं घटेतेत्याह । मीमांसक हा सर्वश्वादी नाहीं तो वेदासच प्रमाण मानतो व त्यापासूनच सर्व पदार्थाचें ज्ञान होते व मनुष्यांचे ज्ञान अतीन्द्रिय नाही. त्याचे ज्ञान इन्द्रियापासूनच उत्पन्न होते, झणून ते सर्व पदाथीस जाणूं शकत नाही. यास्तव जिनेश्वर सर्वज्ञ नसल्या. मुळे परमार्थ तत्वाचे प्रतिपादन त्याच्याकडून होणे शक्य आहे काय ? अशी शंका मीमांसकानें केली. या शंकेस उत्तर खणून स्तुतिकाराने ___ पुढील लोक सांगितला तो असा. स विश्वचक्षुर्वृषभोऽर्चितः सतां ।
समग्रविद्यात्मवपुर्निरञ्जनः ॥ . . पुनातु चेतो मम नाभिनन्दनो।
.: जिनो जितक्षुल्लकवादिशासमः ॥ ५॥ . स विश्वचक्षुरित्यादि । स प्रागुक्तविशेषणविशिष्टो भगवान् । विश्वचक्षुः चक्षुरिव चक्षुः केवलज्ञानं, पदार्थप्रकाशनहेतुत्वात् । वि
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org