________________
"..
.
णाय । कथम्भूताय ? अथिने तत्त्वपरिज्ञानाभिलाषिणे । सुगतवत्परतारकत्वेनासौ तत्त्वं कथितवान् भविष्यतीत्याह । इति चेन्नेत्यध्याहारः । । अंजसा परमार्थेन । ननु बुभुक्षादिदुःखपीडितः कदाचिद्वितथमपि कथयिष्यत्यतोऽजसेत्ययुक्तमित्यत्राह । बभूव च ब्रह्मपदामृतेश्वरः । ब्रह्मपदं मोक्षस्थानं तस्य अमृतं अनन्तं सुख तस्येश्वरः स्वामी । अतः कथं तत्र क्षुद्दुःखलेशोपि यतः केवलिभुक्तिपरिकल्पना श्रेयसी स्यात्।
मराठी अर्थ:-आदितीर्थकराने आपल्या शुक्लध्यानरूपी अग्नीने आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या रागद्वेषाच्या उत्पत्तीचे मूलकारण अशा चार घातिकर्माचे निर्दयपणे भस्म केले, व जीवादिपदार्थांचे स्वरूप जाणण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या भव्य जीवांना जीव दि तत्वांचे खरे स्वरूप समजाऊन सांगितले, आणि मोक्षांतील सुखाचें स्वामित्व मिळविले. विशेष स्पष्टीकरण बुद्ध वगैरे भिन्न मतसंस्थापकांनी जो उपदेश केला होता तो परमार्थ नव्हता, ह्मणजे सत्य नव्हता. बुद्धांदिकांचा उद्देश लोकांना फसविण्याचा होता. व श्री जिनेश्वराचा उपदेश स्वस असल्यामुळे यांत फसवेगिरीचा लेशही नाही हे सिद्ध होते. आता येथे कोणी ह्मणेल की, सर्वज्ञ केवली जर आहार करीत नाहीत तर भुकेने पीडित होऊन एखादेवेळेस ते असत्य देखील उपदेश करतील, तेव्हां त्यांचा उपदेश आह्मी कसा प्रमाण मानावा? या शंकेचे उत्तर आचार्यानी असे दिले की, श्री भगवान आदितीर्थकर मोक्षांत असलेल्या अनंत सुखाचे स्वामी होते. यामुळे त्यांना भुकेची वेदना होत नव्हती व त्यामुळे त्यांच्या ज्ञानांत उणेपणाही न आल्यामुळे त्यांचा उपदेश अबाधित व. प्रामाण्ययुक्त होता, हे सिद्ध होते. याचे स्पटीकरण असे की, श्वेताम्बर लोक केवली कवलाहार करतात असे मानतात; परंतु त्यांचे हे झणणे योग्य नव्हे. कारण जर
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org