________________
च्या पहिल्या तीन विभागांत या भरत क्षेत्रांत क्रमाने उनम मध्यम व जघन्य भोगभूमीची रचना असते. अवसर्पिणी काला
च्या या तिसऱ्या विभागाच्या शेवटी नाभिकुलकराच्या पोटी . भगवान् आदितीर्थकरांचा जन्म झाला. त्यावेळेस देवांनी यांना मेरुपर्वतावर नेऊन क्षीरसमुद्राच्या जलाने यांचा अभिषेक केला. तारुण्यामध्ये पुनः देवांनी येऊन यांचा विवाहोत्सव मोठ्या थाटाने केला व पुढे यांना देवांनी राज्याभिषेक करून राजसिंहासनावर बसविले. यावेळेस कल्पवृक्षांचा पूर्ण अभाव झाल्यामुळे सर्व प्रजा जीवनाचा काही तरी उपाय सांगा ह्मणून आदितीर्थकराजवळ दीन होऊन आली. त्यांनी क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे तीन वर्ण उत्पन्न केले व त्यांना जीवनोपाय सांगितला. ग्राम, नगर इत्यादिकांची रचना कशी करावी हेही सांगितले व पुष्कळ काळपर्यंत राज्याचा आनंदाने उपभोग घेतला. यांना पंधरावे मनु असेंही ह्मणतात. तदनंतर यांना वैराग्य झाले. आता येथे अशी शंका येईल की आदितीर्थकरांनी षट्कमांचा उपदेश कसा केला? कारण, या कर्मापासून हिंसादिक पा होतात. तेव्हां असा उपदेश करणे त्यांना योग्य आहे काय? या शंकेचे उत्तर असे आहे की ज्यावेळेस त्यांनी हा उपदेश दिला त्यावेळेस त्यांनी दीक्षा घेतली नव्हती. ते मुनीपदाला पोहोंचले नव्हते. त्यांची त्यावेळेस गृहस्थावस्थाच होती व ते सरागी होते ह्मणून त्यांचे हे करणे योग्यच होते. श्लोकामध्य अद्भुतोदय हे विशेषण जिनेश्वरास लाक्ले आहे. याचा अर्थ हा आहे की प्रत्येक तीर्थकराची पांच कल्याणिकें होतात, असा नियम आहे. तेव्हां यांत कांही आश्चर्य नाही. तशीच पांच कल्याणिके यांचीही देवांनी केली. परंतु यांच्या विवाहसमयाँ व राज्याभिषेकसममीही देव आले होते व ही दोन कार्ये
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org