________________
राजन् माझा नमस्कार निर्दोष असे भगवान् जिनेश्वरच सहन करू शकतात. रागद्वेषाने भरलेल्या तुझ्या देवाला माझा नमस्कार सहन होणार नाही. तो फुटून त्याचे तुकडे होतील. आचार्यांचे हे भाषण ऐकून राजाला आश्चर्य वाटले.
तो ह्मणाला काही हरकत नाही परंतु तुला मात्र अवश्य नमस्कार करावा लागेल. तुझ्या नमस्काराचे सामर्थ्य आह्मी पाहणार आहोत. योग्याने, मी सकाळी माझ्या नमस्काराचें माहाम्य तुमच्या नजरेस आ. णून देईन, असें मटले. राजाने योग्याला मोठ्या बंदोबस्तांत ठेविलें. दोन प्रहर रात्र उलटून गेल्यावर आचार्य मनांत विचार करूं लागले की मी तर अविचाराने असे बोलून गेलो. आतां सकाळी काय होईल हे सांगवत नाही. याप्रमाणे चिन्तातुर होऊन मनामध्ये जिनेश्वराचे स्मरण करीत असतां जैन शासनदेवता पद्मावतीचे आसन कैपित झाल्याने ती तेथे आली व ह्मणाली ' अहो तुह्मी चिंता करूं नका. तुझी जे काल बोलून गेलात ते सर्व घडून येईल. पूर्ण शांति देणा-या चोवीस तीर्थकरांची ' स्वयंभुवा भूतहितेन भूतले' या पद्यांशाचा आधार घेऊन तुझी स्तुति करा ह्मणजे अवश्य तें महादेवाचे लिंग फुटेल.' असे बोलून ती जिनभक्तितत्पर देवता निघून गेली. आ. चाऱ्यांना देवतेच्या दर्शनाने मोठा आनंद झाला. त्यांनी चोवीस तीर्थकरांची स्तुति रचिली व ते निश्चिन्त चित्त होऊन राहिले. आज सकळी भापल्याला अद्भुत प्रकार दृष्टीस पडणार या हेतूनें राजा आपल्याबरोबर पुष्कळशी मंडळी घेऊन तेथे आला. देवळाचा दरवाजा उघडला गेला व त्या योग्याला बाहेर आणिले. त्या वेळेस त्या योग्याच्या तोंडावर अपूर्व तेजाची सुंदर छटा पसरली होती. ते तेज पा. हिल्याबरोबर, हा ह्मणाला त्याप्रमाणे अवश्य होईल, अशी राजाची खात्री झाली. तदनंतर राजाने योग्याला नमस्कार करण्यास सांगितले. यो. स्याने लागलीच मोठ्या भक्तीने मधुर शब्दांनी चोविस तीर्थकरांची
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org