________________
(२४१)
'भूतानां प्राणिना । तथा ब्रह्म परमात्मस्वरूपं, ब्रह्मचर्य बा, परममुत्कष्टं जगति विदितं यथावज्ञातं । न सा अहिंसा तत्र तस्मिन्नाश्रमविधौ पाखं• जिप्रकारे । यत्र यस्मिन् तद्विधौ । आरम्भो व्यापारोऽस्ति । कथम्भूत ? अणुरपिच स्वरूपोऽपि न केवलं महान् । यत एवं ततस्तस्मारका रणात् तत्सिद्धयर्थं तस्या अहिंसायाः सिद्धयर्थं निरतिचाराहिंसावतसिद्ध ग्रन्थं परिग्रहं । उभयं बाह्याभ्यन्तरं च भवानेव न सुगतादिः । अत्याक्षीत् परित्यक्तवान् । किंविष्टिः परमकरुणः परमा करुणा दया यस्य तथाभूतस्यापि भगवतो यथा जातलिंगविरोधी कश्चिद्विकारादिर्भविष्यति इत्यत्राह नचेत्यादि । वेषव जटा मुकुट भस्मोलनादिः उपविश्व वस्त्राभरणाक्षसूत्राजिनादिपरिग्रहः विकृती यथाजात लिंगविशेधिनौ तौ तौ वेषोपधीच तयो रत आसक्तो नच नैव ।
मराठी अर्थ :- संपूर्ण प्राणिमालावर दया करणं हेच परमात्म स्वरूपाची प्राप्ति होण्याचे साधन होय. संपूर्ण प्राण्यांवर दया करणें झणजे संपूर्ण प्राण्याविषयीं परमसमता धारण करण होय. शत्रु व मित्र याविषयीं रागद्वेषाचा त्याग करणे अर्थात् शत्रु व मित्र ही भेदकल्पना सोडून देणे. यासच पूर्ण अहिंसा झणतात. जेव्हां अशी अहिंसा - अशी शांति आपणांस लाभते तेव्हां आपल्या आत्म्यास परमात्मपद मिळतें. परंतु हे नमि प्रभो, पाखंडी ऋषींच्या आश्रमामध्ये या अहिंसेचा ले शसुद्धां दिसून येत नाहीं. कारण, तेथे पंचादि साधन जलस्नान इत्यादि कृत्यें पाखंडी ऋषींकडून केली जातात. पंचाग्निसाधन केल्यान जावहिंसा होते, जलस्नान केल्यानें जलकायिक जी वांची हिंसा होते. तसेंच स्नान करतांना बरेच सूक्ष्म जंतु जटेमध्ये अडकतात व पंचामितपाच्यावेळीं ते जंतु अग्रीमध्ये पडून मृत्यु पावतात. यामुळे पाखंडीऋषींच्या आश्रमामध्यें आरंभ पूर्ण भरलेला आहे. जेथें असा आरंभ आहे अशा ठिकाणीं
Jain Educationa International
-
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org