________________
(२१२) बादामध्ये कसा प्रवेश झाला याचे एकांतवाद्याच्या तर्फे वर्णन करून त्या सर्व दोषांचा परिहार करून अनेकांत वाद सर्वथा निर्दोष आहे हे सिद्ध कव.
१ विरोध-एका पदार्थामध्ये परस्परविरोधी दोन स्वभाचांची कल्पना केली ह्मणजे किंवा हे दोन धर्म त्या पदार्थात मानले झणजे तेथे विरोध दोष उत्पन्न होतो. जसें अग्नि शीतल व उष्ण ही आहे असे मानणे. हे मानणे विरोध दोप सहित आहे. तसेच अनेकांतमत ही पदार्थामध्ये परस्परविरुद्ध असे अस्तित्व व नास्तित्व हैं दोन धर्म मानते, यामुळे या मतांत हा विरोध दोष उत्पन्न होतो. कारण जेथें अस्तित्व आहे तेथे नास्तित्व राहणे अशक्य आहे. जेथे नास्तित्व आहे तेथें अस्तित्व रहात नाही.
२ वैयधिकरण्य-ज्यांचा आधार भिन्न भिन्न आहे अशा दोन स्वभावांची एका पदार्थात कल्पना करणे यास वैयधिः करण्य दोष ह्मणतात. जसें स्त्रीत्वधर्माचा आधार स्त्री आहे व पुरुषत्व धर्माचा आधार पुरुष आहे. परंतु या दोन्ही धर्माची -स्वभावांची एका आधारामध्ये कल्पना केली मणजे हा दोष उत्पन होतो. परंतु अनेकांत मत दोन भिन्न आधारामध्ये राहणाऱ्या अस्तित्त्व, नास्तित्व धांची एका आधारामध्ये का ल्पना करते. अस्तित्व हे भावात्मक पदार्थामध्ये राहते व नास्तित्व हे अभावात्मक पदार्थामध्ये राहते. गाढवाच्या शिंमा: मध्ये नास्तित्व धर्म आहे व पदामध्ये अस्तित्व धर्म आहे. परंतु यांची एकाच आधारामध्ये कल्पना करणे. जसे घागर आहे व नाहींही, असें ह्मणणे.
३ अनवस्था- ज्या रीतीने पदार्थामध्ये एक धर्म मानतो व ज्या रीतीने आपण दुसरा धर्म मानतो त्याच रीतीने याचा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org