________________
(२३) पार्तिक यामध्ये केले आहे. पूज्यपाद आचार्यांच्या एक शिष्याचे वज्रनंदी असें नांव होते. याने द्राविडसंघाची उत्पत्ति केली असें देवसेन आचार्यांनी आपल्या दर्शनसार नावाच्या ग्रंथामध्ये झटले आहे. तें असें
सिरिपुज्जपादसिस्सो दाविडसंघस्स कारगो दुठो।
मामेण वज्जणंदी पाहुडवेदी महासत्तो ॥ २४ ॥ अर्थ:--श्री पूज्यपाद आचार्यांच्या वज्रनंदी शिष्यांने द्राविडसंघ उ. त्पन्न केला. तो प्राभतशास्त्राचा जाणता होता, व सामर्थ्यवान होता, याने द्राविडसंघाची उत्पत्ति केव्हां केली याचा उल्लेख असा
पंचसये छव्वीसे विकमरायस्स मरणपत्तस्स । - दक्खिणमहुराजादो दाविडसंघो महामोही ॥ २८ ॥
अर्थ:--विक्रम राजाच्या मृत्यूनंतर ५२६ वर्षांनी दक्षिण मथुरेत [ मडुरा ] महामूढ असा द्राविडसंघ उत्पन्न घाला.
प्रसिद्ध इतिहासज्ञ के. बी. पाठक यांनी कानडी ग्रंथाच्या आधारे हे सिद्ध केले आहे की दुर्विनीत राजाचे वेळी पूज्यपादाचार्य झाले आहेत. पूज्यपादाचार्य दुर्धिनीत राजाचे गुरु होते. या राजाने विक्रम संवत् ५३५ पासून ५५० पर्यंत राज्य केले. वज्रनंदि हा जरी पूज्यपाद भाचार्याचा शिष्य होता तथापि त्याने भाचार्य,चे अस्तित्व असतांनाच झाविड संघाची स्थापना केली असावी. यावरून विक्रम संवत् ५०० पासून ५७० पर्यंत पूज्यपाजांचे अस्तित्व होते असे मानण्यास काही हरकत नाही हे सिद्ध होतें..
भाता भापण समंतभद्राचार्यांचा काल निर्णय करू. पूज्यपादाचार्याच्या काल निर्णयानें समन्तभद्राचार्यांच्या काल निर्णयाला मोठी मदत होते. भगवान् महावीर स्वामी मोक्षाला गेल्यानंतर ६८३ बर्षेपर्यंत भारत
धात मंगवानाची प्रवृति राहिली होती. असें भगवजिनसेनाचार्य, हरिवंशकार जिनसेनाचार्य यांनी क्रमाने आपल्या आविपुराण महरिवंश
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org