________________
बोचे बेळेस झाले आहेत. त्यांनीही । जीवसिद्धि या नावाचा प्रय लिहिला आहे असे वादिराज कवि आपल्या पार्श्वनाथचरितामध्ये लि. हितात. परंतु तो ही ग्रंथ उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नाही.
आचार्य समंतभद्रांनी कोणते कोणते ग्रंथ रचिले याचे थोडक्यांत वर्णन केले. आता आचायांचा समय निर्णय करण्याचा यथाशक्ति प्र. परन करण्याचे मनांत योजिलें आहे.
... आचार्य समंतभद्रांचा कालनिर्णय.
याविषयी अनेक मते आहेत. आचार्य समंतभद्रांनी. या भर. तभूमीला आपल्या जन्माने केव्हां पवित्र केले याचा निर्णय करणे कठिण आहे. कारण यांच्या कालाचा योग्य निश्चय करण्यासारखे प्र. माण अद्यापि उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांचे अनेक तर्क चालणे शक्य आहे. आचार्य समंतभद्र हे विक्रमाच्या दुसऱ्या शतकात झाले आहेत. असे कित्येकांनी ठरविले आहे, व महामहोपाध्याय पं. सतीशचंद्र विद्याभूषण एम: ए. यांनी समंतभद्राचार्य ई. सन ६०० मध्ये झाले आहेत असे ठरविले आहे. परंतु हे दोन्ही तर्क अयोग्य आहेत असे वाटते. पूज्यपादांनी जनेंद्र व्याकरण रचिले आहे. पूज्यपादांना देवनंदी असें ही दुसरे नांव आहे. या भाचायांचे चरित्र कर्णाटक भाषेत एका विद्वानाने लिहिलेले आढळते. त्यावरून विचार केला अ. सतां पूज्यपादाचार्य विक्रमाच्या पाचव्या शतकामध्ये झाले असावेत असें ठरते. येथे पूज्यपादाचार्याच्या कालाचा निर्णय करण्याचे कारण हैं आहे की यांनी आपल्या जैनेंद्र व्याकरणाच्या अंती ' चतुष्टयं समंतभद्रस्य' या सूत्रोल्लखाने भगवान् समंतभद्राचार्यांचा उल्लख केला. आहे. यावरून पूज्यपादाचार्य हे समंतभद्राचार्यांच्या मागाहून झाले : आहेत हे सिद्ध होतें. पूज्यपादाचार्य हे अकलंक, विद्यानंद, प्रभा. चंद्र, यांच्या पूर्वी झाले आहेत. कारण, अकलंक व विद्यानंदांनी पूज्यपादाचार्यांच्या सर्वाथसिद्धीचे स्पष्टीकरण तत्त्वार्थ वार्तिक व श्लोक
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org