________________
( १६९) न्यता आली नाही काय? याचे उत्तर आचार्यांनी असे दिले आहे. 'काळा साप' ह्मणजे कथंचित काळा साप, अर्थात पाठीमध्ये व शेपटांत काळा, पोट, दांत, व तोंड ही ध्याचे काळी नाहीत असा, किंवा सर्प देखील एखादाच काळा. सर्वच सर्प काळे आहेत असे विधान या स्यात् शब्दाने होत नाही. स्यात् शब्दाने विशेष धर्मास सामान्यपणा येत नाही. यास्तव आचार्यांनी विशेष धर्मास सामान्यता येईल अशा शंकेचे उत्तर ' विवक्षितात्स्यादिति तेऽन्यवर्जनम् ' या चाक्याने दिले आहे. तेव्हां काळा साप असे जेव्हा आपण मणतो त्यावेळेस आपली विवक्षा पाठीने व शेपटाने काळासाप असे ह्मणण्याची असते. परन्तु स्यात् शब्दाचा प्रयोग केला नाही तर एखादा मनुष्य सापाचे सर्व अवयव काळे असतात, असे समजून घेईल. ते त्याने तसे न समजावें व विशेष धर्म व्यापक होऊन त्याला सामान्यता प्राप्त होऊ नये यास्तव स्यात् शब्दाची योजना केली झणजे में विवक्षित असते त्याचे ग्रहण होते व जे अविवक्षित असते त्याचा त्याग होतो. आतां - पण हमेशा स्यात् शब्दाचा प्रयोग कोठे करीत असतो? कशञ्चित् काळा साप असे आपण कोठे हाणत असतो? स्यात् शब्द न जोडला तरी आपल्याला जे इष्ट असते तेवढेच ग्रहण करतो व बाकीच्याचा त्याग करतो. यास्तव स्यात् शब्द जोडण्याची जरूरत नाही अशीही शंका येते. या शंकेचे उत्तर असें आहे की, स्यात् शब्द कोठे योजावा हे ज्याला चांगल्या रीतीने समजले आहे त्याने ' स्यात् ' शब्दाचा प्रयोग न केला तरी हरकत नाही. कारण 'सोऽप्रयुक्तोऽपि तत्वज्ञैः सर्वत्रार्थात्प्रतीयते ' स्यात् शब्दाच्या प्रयोगाच्या अभावी देखील विद्वान लोक अभिप्रायावरून स्यात् शब्द येथे आहे असेंच समजतात.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org