________________
नित्यच आहे असे वर्णन करणारा नित्यनय अनित्यनयाचा द्वेष करतो व अनित्यनय पदार्थ अनित्यच आहे असे वर्णन करतो. व तो नित्यनयाचा द्वेष करतो. यामुळे परस्परांच्या अ. पेक्षेने जी परस्परांची सिद्धि होत असे ती या द्वेषामुळे होत नाही; यास्तव हे नय स्वतः आपला नाश करतात. व दुसया नयांचा नाश करतात. परंतु ज्ञानावरणादि कर्ममलांचा नाश करणाऱ्या हे विमल जिना ! सर्वज्ञ अशा आपल्याकडून वर्णिलेले नय परस्पर नयावर उपकार करणारे व एकमेकांची अपेक्षा-गरज ठेऊन पदार्थातील अनेक धर्माची स्वभावांची सिद्धि करणारे आहेत. यास्तव विमल जिनांनी सांगितलेल्या नयांस ' तत्व' ह्मणतात व इतर कुनयांना अतत्व ह्मणतात. ननु यदि नित्योऽनित्यमपेक्षते सोऽपि नित्यं तर्हि सर्वस्य सर्वापेक्षा
प्रसंगात् , प्रतिनिश्तव्यवस्थाविलोपः स्थादित्याशंक्वाह । जर नित्यनय अनित्य नयाची अपेक्षा करतो व अनित्यनयही नित्यनयाची गरज ठेवतो असें ह्मणाल तर सर्व नय सर्वाची अपेक्षा ठेवतील. व यामळे अमुक नयाचा विषय-जाणण्यायोग्य पदार्थ अमुकच आहे असें न समजल्यामुळे पदार्थांची व्यवस्था कशी होणार !
या प्रश्नाचे उत्तर आचार्य देतात. यथैकशः कारकमर्थसिद्धये,
.. समीक्ष्य शेषं स्वसहायकारकम् । तथैव सामान्यविशेषमातृका,
नयास्तवेष्टा गुणमुख्यकल्पतः ॥६२॥ यथेत्यादि । यथा यद्वत् । एकमेकमेकशः । कारकं उपादान. कारणं सहकारिकारणे वा । अर्थसिद्धयै कर्मनिष्पत्तये प्रभवति । कि
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org