________________
( १५४ )
अनेभ्यः । दुरितान्येव पापान्येवाज्ञ्जनानि जीवस्य दुःखका लुप्यहेतुत्वात्तेभ्यः ।
प्र
मराठी अर्थ :- हे जिनेश, आपण रागद्वेपांचा पूर्ण नाश केला आहे, यास्तव आपली आह्मी स्तुति केली किंवा अष्टद्रव्यांनी आपली पूजा केली तरी देखील त्या स्तुतीपासून अथवा त्या पूजेपासून आपले कोणते कार्य सिद्ध होणार आहे ? व आपण क्रोधाचा विलकुल त्याग केला, आपले कोणाशी वैर नाहीं; यामुळे आपली निंदा केल्याने देखील आपले कोणतें नुक सान होणार आहे ? तथापि आली आपल्या पवित्र अनंत ज्ञानादि गुणांची स्तुति करतो व आपल्या गुणांवें निर्मल अंतःकरणानें चिंतन करतो याचे कारण हैं कीं, आमचा आत्मा दुःख देणाऱ्या रागद्वेषादि विकारापासून दूर राहो व त्यास पवित्रता येवो.
-
i
तात्पर्य :- श्री जिनेश वीतराग व पूर्ण समता धारण करबारे असल्यामुळे कोणी त्यांची स्तुति केली किंवा कोणी त्यांची निंदा केली तरी त्यांना आनंद किंवा क्रोध उत्पन्न होत नाहीं. रागद्वेषयुक्त मनुष्याची आपण स्तुति केली किंवा त्यांची आपण निंदा केली तर ते खुष होतात किंवा रागावतात. आईताची पूजा केल्यानें- स्तुति केल्याने देखील ते प्रसन्न होत नाहीत व आबांस इष्ट फल देत नाहीत तर आम्ही त्यांची पूजा तरी कशाला कराची ? अतें हाजूं नये त्यांची पूजा केस्याने स्तुति केल्याने आमचे रागादि कर्मजन्य विकार दूर होतात; व आमचा आत्मा पवित्र होत जातो यास्तव श्री जि. नाची पूजा केल्याने इष्टफलप्राप्ति होते, हैं सिद्ध होतें. तच त्यांची निंदा केल्याने दुःखही अवश्य भोगावें लागतें ह्मणून निंदा करणे अगदी अयोग्य आहे हे सिद्ध होतें.
Jain Educationa International
..
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org