________________
कोणाच्या मनगटामध्ये वाद करण्याची इति असेल तर याला मी भाव्हान करितो, त्याने माझ्याबरोबर बाइ करावयाला साज हावै,
ज्यांनी भस्मक रोगालाही भस्म कसन टाकलं, पावती देवीने ज्यांना उन्नत पदाला पोहोचविलं, ज्यांनी मंत्रयुक्त स्तोवाष्पा पठनाने चंद्रप्रभ तीर्थकरांची प्रतिमा प्रगट केली. या या योगे या कलिकालामध्ये पुनः कल्याणकारक असा जैनधर्म उदयास आलाप सर्व भव्य लोकांचे कल्याण झाले. असे ते समंतभद्र आचार्य भामांस बंध आहेत. प्रथमतः मी पाटलीपुत्र शहरामध्ये बाद करण्यासाठी मेरी वाजविली होती. तदनंतर माळवा, सिंध प्रांत, ढाका, कांचीपूर व वैदिश या ठिकाणी बादमेरी वाजविली होती. तदनंतर विद्वानांनी व शूर पुरु. षांनी भरलेल्या करहाटक देशांत गेलो होतो. हे राजा, वाद करण्याची इच्छा करणाग मी सिंहाप्रमाणे निर्भय होऊन फिरत आहे. __ यापमाणे मलिंषण प्रशस्तिमध्ये आचायांचा वृत्तांत बणिला आहे. या मलिषण प्रशस्तिमध्ये वादिराज, दयापाल, वगैरे आचार्यांचा उल्लेख भाहे. ही प्रशस्ति फार महत्वाची आहे. या प्रशस्तिची ऐतिहासिक हकीकत सत्य आहे. इतिहास संशोधकांना या प्रशस्तिचा फार उप. योग होतो. या प्रशस्तीत आचार्य समंतभद्र यांची जी हकीकत लिहिली आहे ती प्राचील आहे. ब्रह्म नेमिदत्त यांनीहि आराधना कथा कोषामध्ये आचार्यांची हकीकत लिहिली आहे यामुळे ती विश्वसनीय आहे. तसेंच प्रभाचंद्र आचायांनी प्राकृत भाषेत आचायांचे चरित्र लिहिले आहे त्याचा आधार घेऊन नेमिदत्त आचार्यांनी समंतभद्र आचायांचे चरित्र लिहिले आहे असे ही ह्मणतात. अशी हजार हजार वर्षांची प्राचीनप्रमाणे याविषयी सांपडतात. __ 'प्राचीन लेखमाला' या पुस्तकामध्ये आचार्य समंतभद्राविषयी असा उल्लेख आहे---
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org