________________
(७४) सल्यामुळे शुक्ललेश्या त्या गुणस्थानवी तीर्थकरांना कशी असू शकेल ? परंतु आचार्यांनी 'पद्मपलाशलेश्यः ' हा शब्द ठेऊन त्यांना शुक्ललेश्या आहे असे सांगितले, यामुळे या ठिकाणी आचार्यांचे हे वचन विरुद्ध आहे असे वाटते. पण थोडासा विचार केला तर हा विरोध दूर होऊ शकतो. तो असा:
कपाय व योगप्रवृत्ति यांना लेश्या ह्मणतात. यापासून चार प्रकारचा बंध होत असतो. चार प्रकारच्या बंधामध्ये प्रकृति बंध व प्रदेश बंध हे दोन योगप्रवृत्तिमुळे होतात. 'जोगा पांडपदेसा' हे वचनहीं तेच सांगते. व स्थिति बंध आणि अनुभाग बंध हे कषायापासून होतात. ' ठिदि अणुभागा कपायदो होति ' या वचनावरूनही हेच सिद्ध होते. पण जेथें कषायोदय नसतो तेथे केवळ योगांनाच उपचाराने लेश्या असें मटले आहे. व तेथे उपचरित शुक्ल लेश्येचें कार्य देखील केवळ प्रकृति, प्रदेशबंध हेच होतात. स्थिति के अनुभागबंध होत नाही. ह्मणून पद्मग्रम तीर्थकरांना भावलेश्या शुक्ललेश्याही उपचाराने समजावी. __'पद्मालयालिंगितचारुमूर्तिः' हैं एक विशेषण पद्मप्रभ तीर्थकरांचे वर्णनाकरिता दिलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट लि. हिला आहे. येथे विशेष हैं आहे की केवलीचे शरीर परमौदारिक असते. व त्यांत निगोद जीवांना स्थान मिळत नाही. तसेच तीर्थकराचें शरार समचतुरस्र संस्थान युक्त असतें ह्मणून ते अतिशय सुंदर दिसते. जसे एखाद्या चतुर कारागिराने बांधलेला राजवाडा प्रमाणबद्ध व निर्दोष , सुंदर असतो. तद्वत् समचतुरस्र संस्थान नामकर्मोदयाने तीर्थकरांचे शरीर अतिशय सुंदर, प्रमाणबद्ध व अनेक शुभ लक्षणांनी युक्त असें असते, .
रान समजावा.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org