SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 206
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार सूचक आहे. परमार्थ कार्य-कारण भावाचा सूचक नाही व्यवहार नय भाषेचे उपचारकथनाचे गढ रहस्य अध्यात्म भाषेचे मर्म जाणल्याशिवाय यथार्थ समजू शकत नाही. काल द्रव्याचे लक्षण स कालो यन्निमित्ताः स्युः परिणामादिवृत्तयः । वर्तनालक्षणं तस्य कथयन्ति विपश्चितः ॥ ४० ॥ अर्थ- सर्व द्रव्यांचे प्रतिसमय होणारे सामान्य परिवर्तन व एक पर्यायरूप परिणामाचे अन्य-अन्य पर्याय रुपाने परिणामान्तर, गति आदि परिणमन क्रियेचा काल, जीवाच्या वयोमानाचे परत्व-अपरत्व-लहानमोठेपणा, वस्तूचा कालाश्रित जुने-नवेपणा या सर्वाचा बोध ज्याचे निमित्ताने होतो त्यास ज्ञानी लोक कालद्रव्य म्हणतात. काल द्रव्याचा उपकार अन्त तकसमया प्रतिद्रव्यविपर्ययं । अनुभूतिः स्वसत्तायाः स्मृता सा खलु वर्तना ॥ ४१ ॥ अर्थ- प्रत्येक द्रव्याच्या आपापल्या प्रतिसमय होणाऱ्या परिणमना मध्ये त्या त्या द्रव्याच्या स्वरुपसत्तेची जी प्रतिसमय होणारी अनुभूती तिला वर्तना म्हणतात. प्रत्येक द्रव्याचा तो निश्चयकाल स्वकाल म्हटला जातो. निश्चय-व्यवहार-कालाचा उपकार आत्मना वर्तमानानां द्रव्याणां निजपर्ययः । वर्तनाकारणात् कालो भजते हेतु कर्तृतां ॥ ४२ ॥ अर्थ- प्रत्येक द्रव्य प्रतिसमय आपापल्या पर्याय रूपाने स्वयं परिणमन करतात- काल द्रव्य त्यांचे बलात् परिणमन करवीत नाही Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy