SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 191
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार द्रव्य लक्षण समुत्पादव्यय ध्रौव्य लक्षणं क्षीण कल्मषाः । गुणपर्ययवद् द्रव्यं वदन्ति जिन पुंगवाः ।। ५ ।। .' अर्थ- अठरा दोषानो रहित वीतराग - सर्वज्ञ जिनेंद्र भगवंतानी द्रव्याचे लक्षण सत् सांगून (सद् द्रव्य लक्षणं) ते सत् उत्पाद - व्यय -- ध्रौव्य या तीन अंशधर्मानी युक्त म्हटले आहे. (उत्पाद - व्यय – ध्रौव्य युक्तं सत्) अर्थात प्रत्येक वस्तु प्रत्येक पदार्थ प्रत्येक द्रव्य हे शाश्वत अनादिनिधन सत् स्वरूप आहे. वस्तूचा हा सतधर्म प्रतिपक्ष सापेक्ष आहे. अर्थात् सत्चा प्रतिपक्ष उत्पाद - व्ययरूप असत् त्याने सहित आहे. . . .... ... येथे असत् याचा अर्थ तुच्छभावा असत् हा अभिप्रेत नसून उत्पाद - व्ययरूप परिणमशील असत अभिप्रेत आहे. वस्तुचे सत् लक्षण हे सत् - असत् स्वरूप अनेकान्तात्मक - परस्पर - विरोधी उभय धर्मात्मक आहे. या वस्तूच्या सत् - असत् धर्मालाच शास्त्रीय भाषेत उत्पाद - व्यय - ध्रौव्य स्वरूप म्हणतात - त्यालाच सामान्य विशेष किंवा द्रव्य - गुण - पर्याय अशी शास्त्रीय परिभाषेत नावे आहेत. वस्तुचा सामान्य धर्म द्रव्य धर्म किंवा गुणधर्म हा सदा सत्रूप, ध्रुव, एकरूप, अभेद रूप तत्रूप - अन्वयरूप असतो. वस्तूचा विशेष धर्म पर्याय धर्म हा असत् रूप - उत्पाद - व्ययरूप, अध्रुवरूप, अनेकरूप, भेदरूप - अतत् रूप व्यतिरेक स्वरूप असतो. ___ याप्रमाणे प्रत्येक वस्तु सत् - असत्, उत्पाद - व्यय - ध्रौव्य युक्त, द्रव्य गुण - पर्याय वान्, सामान्य - विशेषात्मक, एक - अनेकात्मक, नित्य - अनित्यात्मक, भेद -- अभेदात्मक, अन्वय व्यतिरेकात्मक इत्यादि परस्पर विरोधी धर्मानी युक्त असून देखील एकाच वस्तूमध्ये युगपत् हे परस्पर विरोधी धर्म अविरोधरूपाने, अविनाभ व रूपाने निरनिराळया नय – निक्षेप विवक्षेने राहतात, हे सिद्ध करणे हे अनेकान्त जैन शासनाचे वैशिष्ट्य आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy