________________
परंतु आकाश प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे अनेक द्रव्याना युगपत् अवकाश देण्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे एका पुग्दलपरमाणूमध्ये अशी अवगाहन शक्ती आहे कीं, तो जसा आकाशाच्या एका प्रदेशात राहतो त्याच प्रदेश भागात अनंत पुग्दल परमाणू देखील परस्पर अबद्ध परमाणू रूपाने किंवा परस्पर बद्ध स्कंध रूपाने देखील राहू शकतात. असंख्तप्रदेशी लोकाकाशामध्ये अनंतप्रदेशी पुग्दलद्रव्यांचा समूह एकक्षेत्र अवगाहरूपाने राहू शकतात.
तत्वार्थसार
प्रत्येक द्रव्यामध्ये प्रदेशवत्त्व नामक सामान्य गुण आहे. त्यामुळे कालद्रव्य व पुग्दल परमाणु हे एकप्रदेशवान् व बाकीची द्रव्ये बहुप्रदेशवान् आहेत. बहुप्रदेशी द्रव्याना जो आकार येतो तो प्रदेशवत्त्व गुणाच कार्य नसून आकार संस्थान हा पुग्दल द्रव्य पर्याय आहे. लोकाकाश प्रमाण एक पुद्वल महास्कंध आहे म्हणून लोकाकाश वेत्रासनाकार विशिष्ट आकाराचा म्हटला जातो. लोकाकाशाप्रमाणे धर्म अधर्म द्रव्याला केवली समुद्घात गत जीव द्रव्याला जो आर येतो तो या पुग्दल स्कंधामुळे येतो.
www
Jain Education International
संसारी जीवाला जो आकार येतो तो ज्या शरीरात प्रवेश करतो त्या त्या विशिष्ट शरीराच्या आकाराचा होतो. विग्रह गतीमध्ये देखील जीव ज्या गतीतून अन्यगतीत जातो त्या त्या गत्यानुपूर्वीनाम कर्मामुळे पूर्वशरीराकार असतो. कर्ममुक्त सिध्द झाल्यावर देखील जीव ज्या पूर्वीच्या शरीराकाराने मुक्त होतो त्या त्या विशिष्ट आकाराचा राहतो. आकारवान् असणे हा जीव स्वभाव नाही. नाहीतर सर्व सिद्ध जीव भिन्न भिन्न आकाराचे राहिले नसते. सर्वांचा एकच आकार मानण्याचा प्रसंग आला असता. यावरून आकार - संस्थान हे प्रदेशवत्व गुणाचे कार्य नसून पूल द्रव्याचा पर्याय धर्म आहे. त्यामुळे बाकीच्या द्रव्याना आकार आलेला आहे. अलोकाकाश द्रव्याचा पुग्दलाशी संबंध नसल्यामुळे ते निराकार आहे तथापि आकाश द्रव्य बहुप्रदेशी अनंत प्रदेशी आहे.
-
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org