________________
उपसंहार
इत्येतज्जीवतत्त्वं यः श्रद्धत्ते वेत्युपेक्षते ।
शेषतत्वः समं षड्भिः स हि निर्वाणभाग् भवेत् ॥ २३८ ॥
अर्थ- याप्रमाणे या दुसन्या अधिकारात जीवतत्त्वाचे जे विस्तार पूर्वक वर्णन केले आहे त्या जीवतत्त्वासह बाकीची ६ तत्त्वे अजीव-आस्त्रव-बंध-संवर- निर्जरा - मोक्ष या सात तत्त्वांचे यथार्थ स्वरूप जाणून घेऊन ही सात रूपे धारण करणारा जो परमपारिणामिक भावरूप कारणपरमात्मा त्यालाच उपादेय- आश्रयकरण्यायोग्य समजून त्याचेच जो सम्यग्दृष्टी - ज्ञानी ध्यान करतो. व ही साततत्वे जीवाचे परमार्थ स्वरूप नाही. जीवाने कर्माच्या संयोगात-वियोगात तावत्काल धारण केलेले पर्याय रूप आहे, असे जाणून पर्यायदृष्टीला गौण करून त्याची उपेक्षा करतो. त्यांना हेय आश्रय न करण्यायोग्य समजून या सात विकल्प भेदाचा त्याग करून, उपेक्षा करून या सात तत्वामध्ये सदा एकरूपाने विद्यमान राहणारा जो ध्रुव कारण परमात्मा त्यालाच एकांतपणे उपादेय- आश्रयकरण्यायोग्य मानून त्याचेच श्रद्धान, त्याचेच ज्ञान, मनन-चिंतन- ध्यान करून त्यात अविचल स्थिर होतो त्याला परम निर्वाण सुखाची प्राप्ती होते. कारणपरमात्म्याचे ध्यान हेच तत्वार्थश्रद्धान सम्यग्दर्शन, कारणपरमात्म्याचे ज्ञान हेच निश्चयसम्यग्ज्ञान कारणपरमात्म्यात अविचल स्थिर लीन होणे हेच निश्चय सम्पक्चारित्र हाच मोक्षमार्ग हाच साक्षात मोक्ष .
आत्मा-अनात्मा रूप स्व-परभेद विज्ञान करून स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ती तोच मोक्ष होय ( सिद्धि: स्वात्मोपलब्धि: । )
संसार = ( आत्मा + अनात्मा ) ( द्रव्यकर्म - नोकर्म-भावकर्म ) मोक्ष = (संसार) ( अनात्मा )
= ( आत्मा + अनात्मा ) ( अनात्मा ) आत्मा. ( मोक्ष आत्मा सुखं नित्य: )
अधिकार दुसरा समाप्त
मोक्ष :
=
Jain Education International
प्रथम खण्ड समाप्तः
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org