SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 150
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ रा १०५ अर्थ- योनीचे नऊ प्रकार आहेत. तीन प्रकारचा जन्म धारण करणान्या जीवाची योनि नऊ प्रकारची आहे. १ सचित्त २ अचित्त ३ शीत ४ उष्ण ५ संवृत ६ विवृत ७ सचित्ताचित्त ८ शीतोष्ण ९ संवृतविवृत. देव-नारकी यांची अचितयोनि असते. गर्भजन्मधारीची मिश्रयोनि असते. बाकीच्या संमूर्छनजन्मधारीची तीन पैकी कोणतीही एक योनि असू शकते. काही देव-नारकी यांची उष्ण व शीत यापैकी कोणतीही एक योनि असते. अग्निकायिक जीवांची उष्णयोनि असते. बाकीच्यांची तीनपैकी कोणतीही एक योनि असते. नारकी-देव व एकेंद्रिय जीवांची संवतयोनि असते. विकलेंद्रियाची विवृत योनि असते. गर्भजन्मधारी तिर्यंच व मनुष्यांची मिश्र- (संवृतविवृत) योनि असते. चौयांशीलाख योनिचे प्रकार नित्येतरनिगोदानां भूम्यम्भोवाततेजसा । सप्तसप्त भवन्त्येषां लक्षाणि दश शाखिनां ।। ११० ॥ पट तथा विकलाक्षाणां मनुष्याणां चतुर्दश । तिर्यङ-नारक देवानामेकैकस्य चतुष्टयं ।। एवं चतुरशीतिः स्युर्लक्षाणां जीवयोनयः ॥ १११ ॥ (षट्पदं) अर्थ- (योनि म्हणजे जन्मस्थान)- नित्यनिगोद इतर निगोदपृश्वीकायिक, जलकायिक, वायुकायिक, अग्निकायिक जीवांची प्रत्येकी सात-सात ४२ लाख, वनस्पती कायिक जीवाच्या १० लाख विकलत्रय- (द्वींद्रिय-त्रींद्रिय-चतुरिंद्रिय) जीवांची प्रत्येकी तीन-दोन ( ३ ४ २ = ६) लाख, मनुष्यांची १४ लाख, पंचेंद्रिय तिर्यंच, नारकी व देव यांच्या प्रत्येकी चार-चार लाख योनि असतात. याप्रमाणे सर्व मिळून एकूण ( ८४) लाख योनि आहेत. जन्माचे कुलकोटि प्रकार वर्णन द्वाविंशतिस्तथा सप्त त्रीणि सप्त यथाक्रमं । कोटि लक्षाणि भूम्यम्भस्तेजोऽनिल शरीरिणां ॥ ११२ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy