________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
१०३
विग्रहगतिचा काल चार समयाचा असतो. हा जीव तीन समय अनाहारक असतो. जेथे दोन लोकाकाशाच्या भागामध्ये अलोकाकाशाचा भाग येतो त्याला निष्कट क्षेत्र म्हणतात. त्यामुळे या विग्रहगतिमध्ये जीवाला तीन मोडे घ्यावे लागतात.
___ जन्माचे प्रकार त्रिविधं जन्म जीवानां सर्वज्ञैः परिभाषितं ।
संमूर्छनात् तथा गर्भादुपपादात् तथैवच ॥ १०३ ॥ अर्थ- जन्माचे तीन प्रकार आहेत. १ संमूर्छनजन्म २ गर्भजन्म ३ उपपादजन्म
संमूर्छनजन्म- माता-पित्याच्या रजो-वीर्याशिवाय बाह्यनिसर्ग वातावरण-वारा-ऊन-पाणी यांच्या संयोगापासून जीवाचा जो जन्म होतो त्यास संमूर्छनजन्म म्हणतात.
२ गर्भजन्म- माता-पित्याच्या रजोवीर्यापासून गर्भधारणा होऊन जो जन्म होतो त्यास गर्भजन्म म्हणतात.
३ उपपादजन्म- देव व नारकी यांचा विवक्षित उपपादस्थानापासून जो जन्म होतो त्यास उपपादजन्म म्हणतात.
कोणाचा कोणता जन्म असतो भवन्ति गर्भजन्मानः पोताण्डजजरायुजाः । तथोपपादजन्मानो नारकास्त्रिदिवौकसः ॥ १०४ ॥
स्युः संमूर्छनजन्मानः परिशिष्टास्तथापरे ॥
अर्थ- मनुष्य व संज्ञीपंचेंद्रिय तिर्यंच यांचा गर्भ जन्म असतो. गर्भ जन्माचे तीन प्रकार आहेत. १ पोत २ अंडज ३ जरायुज.
१ पोत- जे जन्मतःच चालू-फिरू शकतात त्यांचा पोत जन्म असतो. जसे- सिंह-वाघ वगैरे.
२ अंडज- अंड्यापासून ज्यांचा जन्म होतो तो अंडज होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org