________________
तरवार्थसार अधिकार २ रा
७ सातव्या गुणस्थानात हा सातिशय अप्रमत्तजीव अधःकरणरूप परिणाम करतो.
८ आठव्या गुणस्थानात अपूर्वकरण परिणाम होतात.
९ नवव्या गुणस्थानात अनिवृत्तिकरण परिणाम होतात.
या सातव्या गणस्थानामधील अध:करण परिणामामध्ये वरच्या जीवाचे परिणाम खालच्या जीवाच्या परिणामासारखे समान होऊ शकतात म्हणून या परिणामास अधःकरण म्हणतात. या गुणस्थानापासून परिणामाची विशुद्धी श्रेणीरूपाने वृद्धी होत जाते. श्रेणीरूप विशुद्धीचे २ प्रकार आहेत. १ उपशमश्रेणी २ क्षपकश्रेणी.
१ उपशमश्रेणीने चढणारा जीव श्रेणीक्रमाने ७-८-९-१०-११ या गुणस्थानापर्यत चढून उपशमाचा काल अंतर्मुहूर्त असल्यामुळे तेथून नियमाने खाली येतो वर चढत नाही.
२ क्षपक श्रेणीने चढणारा जीव-श्रेणीक्रमाने ७-८-९-१०-१२.व्या गुणस्थानात जातो तेथून नियमाने १३-१४ गुणस्थानात जाऊन मोक्षास जातो. खाली पडत नाही.
१ उपशम श्रेणीने चढणारा उपशम सम्यग्दृष्टी किंवा क्षायिक सम्यग्दृष्टीजीव चारित्र मोहनीय प्रकृतीच्या २१ प्रकृतीचा (अप्रत्याख्यानावरण ४, प्रत्याख्यानावरण ४, संज्वलन ४, नोकषाय ९) क्रमाने उपशम करीत. वर ११ व्या गुणस्थानापर्यंत जातो.
२ क्षपकश्रेणीने चढणारा क्षायिक सम्यग्दृष्टी जीव चारित्र मोहाच्या २१ प्रकृतीचा क्रमाने क्षय करीत १२ गुणस्थानात जातो. (११ व्या गुणस्थानात जात नाही.)
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org