SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 39
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ॐ मानपत्र श्रीमान् पूज्य ब्रह्मचारी शेठ जीवराज गौतमचंद दोशी सोलापुर यांच्या करकमलीं:आपण श्री परमपूज्य १०८ शांतिसागर महाराजांच्या प्रेरणेने येथील पहाडावरील जिनमंदिराचे बांधकाम पूर्ण करून त्यांत प्रतिमा-प्रतिष्ठा महोत्सवाचें कार्य केलें. या प्रभावनेमुळे सर्व जैन समाजाला तीर्थक्षेत्र दर्शन करून देण्याला कारणीभूत झालात. या आपल्या तीर्थभक्तिबद्दल आम्ह्मीं आपलें अभिनंदन करतो.. आपण आपल्या वाङ्मय- सेवेच्या अत्युत्कट प्रेमामुळे जैनशास्त्रांचें अध्ययन करून त्यांतील तत्वार्थसूत्र, आत्मनुशासन वगैरे बहुमोल ग्रंथांचा सोप्या व सरळ भाषेत अनुवाद करून, महाराष्ट्र जैन समाजापुढे ठेवलांत व त्यांना आपल्या ज्ञानांचा फायदा करून दिलांत एवढेच नव्हे तर श्री प. पू. शांतिसागर महाराजाजवळ सप्तम प्रतिमाधारी बनून आत्मोन्नतीच्या मार्गास लांगलांत व आपला गृहस्थाश्रम आदर्श बनविलात. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ या संस्थेची आपल्या हातीं सूत्रे घेतल्यापासून यात्रेकरू लोकांच्या, तीर्थरक्षणाच्या दृष्टीनें हरतऱ्हेच्या सोयी आपण केल्या आहेत व क्षेत्राची व्यवस्थाहि उत्तमप्रकारे ठेवली आहे. आणि त्याचें दृश्यस्वरूप म्हणजे आजची सुस्थिति. याचप्रमाणें श्रीक्षेत्र कुंथलगिरीच्या व्यवस्थेंतहि लक्ष घातलें आहे. हे आपल्या उत्कट तीर्थभक्तीचें द्योतक होय. समाजाची आरोग्यदृष्ट्या उन्नति होण्यासाठी आपल्या संपत्तीचा सदुपयोग करून आपण सोलापुर येथें रुग्णपरिचर्यामंदिर, नेत्रचिकित्सालय व व्यायामशाळा या संस्था स्थापन केल्यात. इतकेच करून स्वस्थ राहिला नाहींत तर ज्या ज्या संस्थांचें कार्य हातीं घेतलें, त्या त्या संस्थांना आदर्शवत् बनविण्यासाठीं तनमनधन खर्च केलीत व अजूनहि खर्च करीत आहांत. आपल्या ठिकाणी बसत असलेल्या उत्कट धर्मप्रेम, परोपकार बुद्धि, सत्यप्रीति, निर्भिडपणा, व्यवहार कुशलता या व इतर सद्गुणांमुळें जैन समाजास आपण ललामभून झालांत याबद्दल आम्हाला अत्यानंद होत आहे. आपली हीच वृत्ति दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो आणि आपणाला जैन समाजाच्या कल्याणासाठी दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्राप्त होवो अशी श्री जिनेशचरणी प्रार्थना करतो. धर्मबुद्धिचित धारकर कीना आत्मसुधार, एतदर्थ हम प्रेमसे लाये यह हृदहार | भूषण जैन समाज के धर्म-कर्म आगार, अभिनंदन करते हमें होता हर्ष अपार | श्रीमन् स्वीकृत कीजिये करके कृपा विशेष, अभिनंदन यों आपका होता रहे हमेश | श्री सिद्धक्षेत्र गजपंथ भवदीय गुणानुरुक्त म्हसरूळ ( नाशिक ) श्री दि. जैन गजपंथ सिद्धक्षेत्र मंडळ मिति फा. शु. १२ वीरसंवत् २४६० विक्रम संवत् १९९० Jain Education International व अखिल दिगंबर जैन समाज For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001274
Book TitleTiloy Pannati Part 1
Original Sutra AuthorVrushabhacharya
AuthorA N Upadhye, Hiralal Jain
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1956
Total Pages598
LanguageHindi, Prakrit
ClassificationBook_Devnagari & Geography
File Size12 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy