SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 65
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महाराष्ट्रातील जैन संस्कृती एक संपन्न वारसा महाराष्ट्रातील जैन संस्कृतीचे जागते व गाजते अभिलेख : प्राचीन व मध्ययुगीन काळात आचार्य समंतभद्र (इ. सनाच्या दुसऱ्या शतकात ) कराड (करहाटक ) येथे वादसभेसाठी आल्याचा उल्लेख येतो. मौर्य काळातील एक शिलालेख पाले (जि. पुणे) येथे असून त्यात 'नमो अरिहंतान' अशी पंक्ती आहे. सातवाहन राजा हाल याने संकलित केलेल्या 'गाथा सप्तशतीत' जैन सूरींच्या अनेक गाथा आढळतात. इसवी सनाच्या ६व्या शतकात तेर उस्मानाबाद येथे करकंडू राजाने सुंदर गुहा मंदिरे खोदविली. आठव्या शतकातील राष्ट्रकूटवंशीय राजा दंतीदुर्ग याच्या दरबारात आचार्य अकलंकाचा सन्मान झाला होता. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याने जैन धर्म स्वीकारून नाशिकजवळ चंदनपूर येथे अमोघबस्ती नावाचे जिनमंदिर बांधविले. एलोरा येथील लेण्यात इंद्रसभा लेणी खोदविणारा एक सामंत हा राष्ट्रकूट राजा इंद्र याचा मांडलिक होता. यादवांची राजधानी असलेल्या देवगिरीच्या अंबरकोटीतील जैन मंदिरे आजही आपण पाहू शकतो. कुंडल क्षेत्राला इ.स. ३९४ मध्ये चालुक्य व राष्ट्रकुट राजांनी दान दिल्याचे शिलालेख आहेत. कोल्हापूरच्या शिलाहार वंशातील राजा गंडरादित्य रूपनारायण यांच्या नावाने बांधविलेले रूपनारायण मंदिर व त्या मंदिराचे आचार्य माघनंदी यांचा इतिहास सर्व-ज्ञात आहे. डिचोला पेडणे येथील उत्खननात मिळालेल्या मूर्ती शिलालेखावरून गोवाकोकण विभागातही जैन धर्माचा प्रभाव होता असे दिसून येते. हा प्रभाव महाराष्ट्रात मुसलमानी अमल येईपर्यंत थोड्याफार भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | ६३ महाराष्ट्रात जैन धर्माचे अस्तित्व फार पुरातन काळापासूनचे आहे. महाराष्ट्रीयन जैन समाजाच्या संस्कृतीसही मोठी परंपरा आहे. या प्रदेशात जैन समाजाला इतिहास व भूगोल दोन्हीही आहेत. जैन धर्मामध्ये ज्या स्थानावर तपश्चर्या करून संतमहात्म्ये सिद्धपणास किंवा मोक्षास गेले त्या स्थानाला सिद्धक्षेत्रे म्हणतात आणि अशा सिद्धक्षेत्रांना जैन समाजात अतिशय महत्त्व असून ते अतिशय प्राचीन मानले जातात. अशा तऱ्हेची प्राचीन सिद्धक्षेत्रे नाशिक जिल्ह्यातील गजपंथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी, अमरावती जिल्ह्यातील मुक्तागिरी तथा नाशिकजवळील मांगीतुंगी येथे आहेत. अशा प्रकारची सिद्धक्षेत्रे दक्षिण भारतात कोठेही आढळून येत नाहीत. जैनांचे चोवीसावे तीर्थंकर भ. महावीर यांचा विहार महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात तेर-नातेपुते येथे झाला होता असे प्राकृत भाषेतील प्राचीन साहित्यावरून दिसून येते. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील पैठण-जिंतूर, विदर्भातील शिरपूर ही जैनांची प्रमुख अतिशय क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर-नांदणी, लातूरकारंजा - नागपूर ही महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रमुख शहरेदेखील जैनांच्या मान्यवर भट्टारक पीठांची केंद्रस्थाने म्हणून प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर प्राचीन जिनमंदिराचे अवशेष, शिलालेख इ. पाहावयास मिळतात. - डॉ. रावसाहेब पाटील फरकाने कायम होता. या प्रदीर्घ काळत जैन धर्माला महाराष्ट्रात सर्वत्र मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. आजही महाराष्ट्राचे सौभाग्यलंकार स्वरूप वेरूळ, धाराशिव, अंकाई-टंकाई, पाटण, चांभार लेणी आदी जैन स्थापत्य वैशिष्ट्यांनी नटलेली जैन लेणी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मराठीचे मांगल्यमय मातृत्व : जैन संस्कृतीकडे महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या जैन धर्माविषयीचे साहित्यदेखील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या विविध कालखंडात प्रचलित असलेल्या भाषेमधून झाले आहे असे दिसून येते. विशेष म्हणजे अशा कालखंडानुसार लिहिले गेलेले जैन साहित्य उपलब्ध आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात प्राकृत भाषेचा एक प्रकार असलेली महाराष्ट्री प्राकृत ही जनभाषा व राजभाषा म्हणून मान्यता पावली होती आणि पुढे कालांतराने या भाषेचे अपभ्रंश या लोकभाषेत रूपांतर झाले. साहजिकच महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या दोन्ही भाषेतून जैन आचार्यांनी ग्रंथ रचना केली व त्याचे महत्त्व एवढे वाढवले की अपभ्रंश भाषेतील उपलब्ध साहित्यापैकी तीन चतुर्थांश साहित्य ही फक्त जैन आचार्यांची निर्मिती आहे. या प्रतिष्ठित अपभ्रंश भाषेला राष्ट्रकुटकालीन मराठी असे नावही दिले जाते. जैनांचा महाराष्ट्रांशी व महाराष्ट्रीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. महाराष्ट्रापासून सुदूर असलेल्या श्रवणबेळगोळ येथील गगनस्पर्शी गोमटेश्वराच्या चरणाशी
SR No.522651
Book TitleBhagawan Mahavir Smaranika 2009
Original Sutra AuthorN/A
AuthorMahavir Sanglikar
PublisherJain Friends Pune
Publication Year2009
Total Pages84
LanguageMarathi
ClassificationMagazine, India_Marathi Bhagwan Mahavir Smaranika, & India
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy