SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 49
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ दुर्देवी देव चालू वर्षांत मालगाव, मंगसूळी, निपाणी, इचलकरंजी, रायबाग वगैरे ठिकाणी पंचकल्याणिक पूजा होऊन नूतन प्रतिबिंबाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या मूर्तीच्या स्थापनेसाठी दोन चार हजारो लोक दुरून येतात व ज्या मूर्तीला भव्य अशा सिंहासनावर अधिष्ठित करून पावित्र्य आणतात त्याच मूर्तीवर कित्येक ठिकाणी असा प्रसंग आला आहे की, सिंहासनाऐवजी एखादा कोनाडा, कस्तुरीच्या झुराधाऐवजी पाकोळ्यांची घाण व पूजेऐवजी झुरळ्यांचे वेष्टण असा प्रकार झाला आहे. आणि हा प्रकार निर्जनप्रदेशांतील देवळांतच नसून भर जैनवस्तीच्याच गावी असे अनेक प्रकार दिसून येतात. हे दुर्दैव देवाचेच ना ? एकेकाळी हा भरतवर्ष जैनमय होता. प्रजा जैन व राजेही जैन असल्यामुळे बादशाही अमदानीतील मशिदीप्रमाणे जिनमंदिरांची त्यावेळी वाढ झाली असेल, यात नवल नाही. त्यांची व्यवस्था करण्याचे काम त्यांच्या आटोक्यात होतो; परंतु तो काल आता राहिला नसून आजचा जैन समाज निर्बल बनला आहे. माणसांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे परंतु देवांची व देवळांची मात्र वाढतच आहे. 'अति परिचयादवज्ञा' याप्रमाणे मनुष्याहूनही - आप्पा भाऊ मगदूम ( वीरानुयायी) जैन समाजातील प्रख्यात लेखक, कवी, समाजसुधारक आप्पा भाऊ मगदूम यांच्या जन्मशताब्दीचा समारोप लवकरच होत आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेला "दुर्दैवी देव” हा लेख जैन समाजाला आजही मार्गदर्शक आहे. येथे तो आम्ही पुनःमुद्रित करत आहोत... संपादक जास्त झालेल्या या देवांची व देवळांची आणि क्षेत्रांची अनास्था वाढत आहे. इकडे कोणाचे लक्षच नाही. जैनांची शेकडो मंदिरे अजैन वस्तीत व निर्जन स्थळी असून कित्येक मंदिरांची कुलपे गंजून गेली तरी कोणी तिकडे नाही. कित्येक ठिकाणी मूर्तीवर आच्छादन नाही, तर कित्येक मंदिरातील देवांना हुसकून देऊन तेथे विठोबासारखे देव (?) घुसले आहेत. अशा अनेक प्रकारांनी देवांची विटंबना होत असता तिकडे दुर्लक्ष करून एकेका गावात ३/ ४ मंदिरे बांधण्यातच बरेचजण इतिकर्तव्यता समजत आहेत. परंतु आपला समाज मृत्युपंथाला लागला आहे, त्याला शिक्षणसंजीवनी देऊन कार्यक्षम करण्याकडे मात्र लक्ष कमीच आहे. समाज जर जिवंत राहणार नाही तर ही मंदिरे व देव जिवंत राहतील काय ? अखेर त्यांची विटंबनाच ना? काही जैनमंदिरात देवांची संख्या तीनचारशेपर्यंत गेली असूनही नवीन प्रतिष्ठा होतातच. शिखर बांधले देव आणा, नोपी उद्यापन आहे देव आणा, असे करून देवांची बेसुमार भरती झाली आहे; पण भक्तांना ओहोटी आहे ती कायमचीच! कित्येक मंदिरात सर्व देव वर्षांतून एकदा धुण्याची भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | ४७ - (?) पाळी येते, हा काय विनय ? ही विटंबना आज आपण प्रत्यक्ष पहात असता नवी नवी मंदिरे बांधून (सिंहासन एकच असल्यामुळे) पायरीवर, फळीवर कोनाड्यात आणि बोधावरही देवाची स्थापना करणे हे कोणते शास्त्र? आणि कुठली परंपरा? माझी जैन समाजास अशी नम्र विनंती आहे की, यापुढे नवीन मूर्ती कोणीच घडवू नये. बेकी असली तरीही अनेक जिनमंदिरे बांधण्याचे कारण नाही. ज्यांना नवीन मूर्ती बसविणे जरूरच असेल त्यांनी ज्याठिकाणी मूर्तीची खेचाखेच असेल तेथूनच एखादी न्यावी व तेथील श्रावकांनीही द्यावी. वाजवीपेक्षा जास्त प्रतिमा आणण्याची हाव धरू नये. जुन्या मूर्तीची अवहेलना होत असून नवीन मूर्ती घडविणे हे किती फलदायक होईल याचा विचार करावा. आणि अशाने जो पैसा वाचेल तो आपल्या मुलांना धर्मशिक्षण देण्यात खर्च करून त्यांना स्वधर्मप्रेमी व धर्मनिष्ठ बनवावे. धर्म प्रेम नाही मग जुलमाने पैसा वसूल करून प्रतिष्ठा करण्यातच काय प्रभावना आहे? -
SR No.522651
Book TitleBhagawan Mahavir Smaranika 2009
Original Sutra AuthorN/A
AuthorMahavir Sanglikar
PublisherJain Friends Pune
Publication Year2009
Total Pages84
LanguageMarathi
ClassificationMagazine, India_Marathi Bhagwan Mahavir Smaranika, & India
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy