________________
तरी, वास्तविकता अशी आहे की जैनेतर समाजाकडून जैन समाजाची आदानाची अर्थात् ग्रहणाची क्रिया जितक्या प्रमाणात आहे, तितक्या प्रमाणात जैनांकडून घेण्याची जैनेतरांची प्रतिक्रिया मात्र दिसून येत नाही. जैन समाजात जैनेतरव्रते करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस तर वाढत चालले आहे पण त्याचबरोबर उपवास, प्रत्याख्यान, नियम इ. जैनव्रते करण्याची परंपराही चालू आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, कोणतेही छोटे-मोठे व्रत-नियम-प्रत्याख्यान असो, ते आपण का करतो ?, कशासाठी करतो ? व कसे करतो ? याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
संपूर्ण कर्मबंधापासून मुक्तता', हे जैनधर्माचे मुख्य ध्येय आहे. म्हणूनच भूतकाळातील कर्मबंधापासून मुक्त होण्यासाठी प्रतिक्रमण' व भविष्यकाळात कर्मबंध होऊ नये म्हणून प्रत्याख्यान' हे दोन उपाय जैनधर्मात वारंवार निर्दिष्ट केले जातात. प्रत्याख्यानाचा हा रामबाण उपाय जैनधर्माशिवाय विश्वातील कोणत्याही धर्माने सांगितलेला नाही.
___ बौद्धधर्मात आत्मा अनादि व नित्य' मानतच नाहीत.आत्मा हा संस्कारमय व क्षणिक असा मानल्यामुळे, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या चौकटीत प्राचीन दर्शन असूनही, ‘प्रकृति' म्हणजे जड व 'पुरुष' म्हणजे चेतन अशी दोन तत्त्वे तर मानली आहेत परंतु पुरुष हा तटस्थ व साक्षी असून त्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृतीच सदैव कार्यरत असते, असे सांख्यदर्शन मानते. परंतु जैनदर्शनात मात्र आत्माच कर्ता अर्थात् करणारा व भोक्ता अर्थात् भोगणारा आहे. म्हणून प्रत्याख्यानाचा संबंधही आत्म्याशीच आहे. __व्यवहारात आपण सहजी म्हणून जातो की - याचा मानसिक निश्चय अथवा मनोबल इतके जबरदस्त आहे की, आठ दिवस, पंधरा दिवस अथवा महिनाभर हा अन्नपाण्याचा त्याग करून सहजी राहू शकतो. परंतु भ. महावीरांनी प्रत्याख्यानक्रिया' अध्ययनाचा आरंभच असा केला आहे की, 'आया अपच्चक्खाणी यावि भवति ।' संसारी आत्मा हा अप्रत्याख्यानी आहे. म्हणजे प्रत्याख्यानाचा व आत्म्याचा संबंध स्पष्ट शब्दात जोडला आहे, मनाचा नाही. कारण जैनधर्माने आत्म्यात अनंतशक्ती मानली आहे. म्हणून कोणताही त्याग अथवा प्रत्याख्यान हे आत्मिक बळाच्या आधारे करावयाचे आहे, मन:शक्तीने नाही. मन:शक्तीपेक्षा आत्मिकशक्ती ही अनंतपटीने अधिक आहे. किंबहुना आत्म्याकडून मनाकडे व इंद्रियांकडे शक्तीचा स्रोत पुरविला जातो आणि म्हणूनच जैनधर्म हा “आत्मकेंद्री' आहे.
आज प्रचलित जैन समाजात 'प्रत्याख्यान = आहाराची नियमावली' अशी दृढ धारणा प्रस्थापित झाली आहे. सूत्रकृतांगाच्या प्रत्याख्यानक्रिया या अध्ययनात भ. महावीरांनी आहाराचेच प्रत्याख्यान सांगितले आहे का ? की प्रत्याख्यानक्रिया अजून वेगळ्या दृष्टीने प्रस्तुत केली आहे, त्याचा ऊहापोह आपण या लेखात करू.
___ जैनधर्म हा भावशुद्धीला महत्त्व देणारा आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्याख्यान हे केवळ आहाराचेच नसून जीवाचे क्रोध, अभिमान, छल, कपट, तृष्णा इ. जे आंतरिक दोष अथवा दुर्गुण आहेत, त्यांच्या प्रत्याख्यानालाया अध्ययनात अधिक महत्त्व दिले आहे. आंतरिक दोषांची, दुर्गुणांची अथवा पापांची स्थाने ही अठरा आहेत. या अठरा पापस्थानांनी सदैव कर्मबंध होत असतो म्हणून प्रत्याख्यान, 'अठरा पापस्थानां'चे करण्यास सांगितले आहे.
__ 'अठरा पापस्थान' ही शब्दावली जैन तत्त्वज्ञानात अनेकदा येते. अर्थातच अठरा पापस्थानांना प्राचीन काळापासून अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच या अध्ययनातही संपूर्ण अठरा नावे न देता 'प्राणातिपातापासून ते मिथ्यादर्शनशल्यापर्यंत' अशी शब्दावली उपयोजित केली आहे. सर्व पापस्थानांचा त्याग करताना एक गोष्ट मात्र समान आहे, ती अशी की - हिंसा असो, असत्य वचन असो की चोरी असो, कोणतीही पापक्रिया ही मनाने, वचनोन व कायेने स्वतः करू नये, दुसऱ्यांकडून करवून घेऊ नये व अनुमोदनही देऊ नये. अठरा पापस्थानांवर एकंदरीतच दृष्टी टाकली तर असे दिसून येते की, या मानवी स्वभावात दडलेल्या वेगवेगळ्या भावना आहेत, अंत:प्रवृत्ती आहा. प्रसंगानुसार त्या वेळोवेळी प्रकट होतात. गुणांबरोबर माणसात अवगुणही अनेक आहेत. जसे - सहज जाता जाता कोणाला दगड मारणे (हिंसा), खोटे बोलणे (झूठ), स्वत:च्या मालकीची वस्तू नसताना उचलणे (चोरी), दुराचार (कुशील), संग्रहवृत्ती (परिग्रह), क्रोध, अभिमान, कपट, लोभ, मनासारखे काही घडले की आनंदाची भावना