SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 22
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ No. 3 (३) ऐतिहासिक लेख ] श्री राजेश्री सटवाजी जाधव गोसावी यांसी. इ अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेा. बाजीराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद. सुहुर सन स्वमस अशेरन मया अलफ. जवार व रामनगर व पेठ व वासदे हे चारी संस्थान व परगणे घणदिवि असे स्वराज्यामध्ये आहेत, तेथील अमल स्वराज्याचा व सरदेशमुखी देखील व या खेरीज सुरत प्रांतीचे माहाल वगैरे तापीपार आहेत, त्या माहाली बाबती व सरदेशमुखीचा अमल झाला पाहिजे. याकरितां सदरहु स्वराज्यामध्ये पांच स्थल यांचा अमल देखील सरदेशमुखी, व सुरत प्रांत, व तापीपार परगणे, यांच्या बाबतीं, व सरदेशमुखीचा अमल असा मामला तुमचे स्वाधीन केला असे. तुम्ही इमाने इतबारे वर्तोन जबरदस्तीने जाविता बसऊन अमल बसविणे. कुल वास जमा आकार करणे, त्यांपैकीं जमेती व ठाणीं व माहाल मजकूर देखील खर्चाचा व रसीद ऐवज हुजूर स्वारी मजकूरी पावावयाचा तहः जवार रामनगर व पेठ व वासदे व परगणे घणदिवि, हे स्वराज्यामध्ये आहेत यांचा अमल तुम्ही करणें. मुलकाची जमा व जकायती बंदर पाणवट व खुसकी व कमाविस वाव देखील आकार करणें. तो ऐवज व त्या ऐवजाचे जमेस सरदेशमुखीचा वसूल दरसदे १० रुपये दाहा प्रमाणे रयती निसबतीने वसूल घेणें येणेंप्रमाणे एवज वसूल घेऊन जमा करणे. त्यापैकी दोनी तकसिमा ऐवज जमेती गड व ठाणीं व माहाल मजकूरच्या खर्चास तुम्ही घेणे बाकी तीसरी तकसिम ऐवज हजूर स्वारी मजकूरी लावणे. पेरतर अमल वसवलीया उपरी नीमे ऐवज गड व ठाणी व जमेती व माहाल मजकूरच्या खर्चास तुम्ही घेणे, बाकी नीमे ऐवज रसदी हुजूर स्वारी मजकूरी पावणे. कलम १. येणेप्रमाणे कलमें सदरहु प्रमाणे तह केला असे. तुम्ही जबरदस्तीने आमल बसवून स्वामीकार्य करणे, सदरहु तहप्रमाणे तुम्ही कबूल करून आपले पत्र लिहून दिले आहे. तरी सदरहु तह प्रमाणे रसदी ऐवज हुजूर स्वारी मजकूरी पावता करणे. छ २ जिल्हेज बहुत काय लिहिले. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat The Feshwa Baji Rao Ballal in his order date 1 2nd Jihej, issued to Satvaji Jadava writes: The four states Jawar, Rami.agar, Peth Bansda and Purgana Ghandevi are included in Swarajya. The country www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy