________________
..३२..... एक भाग्यवान व्यापारी ..... मस्तकरेषाहि उत्तम असतां ऐश्वर्य व भाग्य ही मिळालींच पाहिजेत, हा सामुद्रिक शास्त्राचा महत्वाचा सिद्धान्त आहे. त्यांची प्रकृति वयाच्या ६३ व्या वर्षीहि चांगली रहाण्यास, तीच बुध-भाग्य-रेषा कारण आहे. शनि कर्कतत्त्वाचा असल्यामुळे मातेच्या पुण्याईने, समुद्राचे सान्निध्य ठेविल्यानें, नशिब उघडते; तसेंच कर्कतत्व हे जलाप्रमाणेच 'वनस्पतीतत्त्व' असल्यामुळे, वनस्पतिचा [ वनस्पति तुपाचा नव्हे !] सुगंधी-सामानाचा व्यापार, त्यांच्या नशिबी आहे, असेंच स्पष्ट आहे. शनिने कर्कतत्त्वाशी संबंध ठेवून असे निदर्शनास आणून दिलेले आहे की, अशा व्यक्तिचे जीवन प्रारंभी अथवा जन्मतः विहिरी-तलाव एवढेच कदाचित् असले, तरी, 'कर्केचा शनि' असल्यामुळे, श्री शनिदेव, तशा व्यक्तिचे नशिब समुद्रासारखें विशाल करीत असतात, असाच त्यांचा अर्थ होय. डाव्या हातांतील बुधाचे बोट अथवा करांगुलि बोट अगदी प्रामाणिकपणा दाखविणारे, सरळ असे आहे, हेहि अभ्यास करण्यास सहाय्य करणारे आहे. श्री हरगोविंद दास यांच्या उजव्या हातांत : मस्तक-रेषा' अथवा 'बुद्धिरेषा' सरळ आहे; व रविरेषा किंवा यशाच्या रेषांचे प्रवाहहि उत्कृष्ट आहेत.. ____ या दृष्टिने प्रत्येक व्यापाराने आपल्या हातांकडे पाहून व शनिदेव आपले नशिब कोणतें ठरवत आहेत, हे जाणून घेऊन, उद्योगधंदा केला, तर उद्योग महाव्यापक होऊन, व्यापारांत यश, संपत्ति, आणि कीर्ति, यांचे वरदान, शनिकडून त्या व्यापाऱ्यास मिळाल्यावांचून रहाणार नाही, असें श्री हरगोविंद दासजींच्या हस्तरेषा, स्पष्ट दर्शवित आहेत.
___ " जोरु साथ, पैसा गांठ ।" . मापली बायको जशी आपल्याबरोबरच
पाहिजे, त्याप्रमाणे पैसाहि. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com