________________
२२८
સહિરપ્રવેશ અને શાસ્ત્રો
ब्राह्मण तो याती अंत्यज असत, मानावा तत्त्वा निश्चयेंसी; रामकृष्ण नाम उच्चारी सरल, आठवीं सावलें रूप मनीं. शांति दया क्षमा अलंकार अंगी, अभंग प्रसंगीं धैर्यवंत; तुका म्हणे गेल्या षड्ऊर्मी अंग, सोडूनियां मग ब्राह्मण तो. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुलयाती. उत्तम चांडाल नर नारी बाल, अवघेचीं सकल चतुर्भुज. पवित्र तें कुल पावन तो देश, जेथें हरीचे दास जन्म घेति; वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशीं . अंत्यजादि योनी तरल्या हरिनामें, त्याचीं पुरार्णे भाट झाली; वैश्य तुलाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर लतीफ मुसलमान, सेना न्हावी आणि विष्णुदास; कान्होपात्रा खोई पिंजारी तो दादू, भजनीं अभेदूं हरिचे पायीं; चोखामेळा बंका जातीचा महार, त्यांसी सर्वेश्वर ऐक्य करी. ज्याची आवडी हरिनामाची, तोचि एक बहु शुचि. जपतो हरिनाम बीज, तोचि वर्णामाजि द्विज;
तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्तीं तो धन्य. बहुता जातींचा केला अंगीकार, बहुतचि फार सर्वोत्तम. भक्तितें नमावें जीव जंतु भूत.
ठावा नाहीं पांडुरंग, जाणा जातिचा तो मांग; नामायाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव निज सर्वे. मैराल जनक कोण त्याचे कुळ, महिमान तयांचें काय सांगो. देवाची पूजा हैं भूतांचं पालन .
कायबा करिसी सोवळे ओवळे, मन नाहीं निर्मल वाउगेंचि. तुकाराम
७५. चहूं वर्णो नामाधिकार । नामीं नाहीं लहानथोर । जडमूढ पैलपार । पावती नामें ॥ - दासबोध ४; ३; २४.
७८. वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीये सुस्वरें आळवीती ॥
तुकाराम
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com