________________
आतां पूर्वीच्या आवृत्तींत कित्येक ठिकाणी मूळ ग्रंथाची व टीकेची बरीच असंबद्धता दिसून आली. त्या ठिकाणी मूळग्रंथ कायम ठेवून । टीकेंतच कोठे कोठे फेरफार केला आहे. कित्येक ठिकाणी टीका कायम ठेवून मूळांत फेरफार केला आहे. जसें १४५५ श्लोकांत 'असर्यत महीपतेः' असा जयमङ्गलाटीकेचा पाठ आहे, परंतु मल्लिनाथाच्या टीकेंत 'असार्यत महीपतिः' असा पाठ आढळतो, आणि हा जरी (माश्या अल्पमतीला ) योग्य वाटतो तथापि सर्व पुस्तकांत जयमङ्गला टीका असल्यामुळे वरीलच पाठ (अमर्यत महीपतेः) घेतला आहे आणि दुसरा पाठ 'असार्यत महीपतिः' हा खाली टीकेंत दिला आहे.
'प्रायेण मुह्यन्ति हि ये लिखन्ति' ह्या नियमाने हा प्रथमच प्रसंग असल्यामुळे ज्या कांहीं नजरचुकीने प्रकृत पुस्तकांत चुका राहिल्या असतील त्या मद्देशविद्वद्सुहृजनांनी पत्रद्वारा कळविल्यास आदरपूर्वक खीकारून आगामि मुद्रणांत सुधारीन इ० इ०.
क० वि० जो..
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Suratvww.umaragyanbhandar.com