________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : गुरूंच्या पोटात मुरड पडली तर काय सगळ्या शिष्यांनी निघून जावे? आता माझ्या पोटात मुरड पडली तर तुम्ही सगळे निघून जाल का? म्हणजे असा अपराध करू नका. विरोधी व्हायचे नाही. ज्यांना तुम्ही पूजत होता, ज्यांचे तुम्ही अनुयायी होता, त्यांचेच तुम्ही विरोधी बनलात? मग तुमची काय अवस्था होईल? ते गुरूपद जात कामा नये. त्यांना दुसऱ्या दृष्टीने पाहू नका. परंतु आजकाल तर कित्येक लोक दुसऱ्या दृष्टीनेच पाहतात, नाही का?
पुज्यता नष्ट होऊ नये, हेच सार असे आहे ना, चाळीस वर्षांपासून जे आपले गुरू असतील आणि त्या गुरूंना असे काही झाले, तरी आपल्यात काहीही बदल होऊ देऊ नये. आपली दृष्टी तीच ठेवावी, ज्या दृष्टीने पहिल्यांदा पाहिले होते, तीच दृष्टी ठेवावी. नाही तर तो भयंकर अपराध म्हटला जातो. आम्ही तर सांगतो की गुरू कराल तर सावधानीपूर्वक करा. नंतर वेडपट निघाले, तरीही तू त्यांचा वेडेपणा पाहू नकोस. ज्या दिवशी तू गुरू केले होतेस त्यानंतर गुरूंना नेहमी तसेच पाहावे. मी तर त्यांची पूजा केल्यानंतर त्यांनी मारहाण केली किंवा दारू पीत असतील, मांसाहार करीत असतील तरी सुद्धा मी त्यांची पूजा सोडणार नाही. कारण ज्यांना मी पाहिले होते ते वेगळे होते आणि आज या प्रकृतीवश काही वेगळेच वर्तन होत आहे, परंतु हे त्यांच्या इच्छेविरुद्ध घडत आहे, असे लगेच समजावे. आपण एकदा हिरा पसंद करून घेतला, मग आता काय? तो पुन्हा काच होईल का? तो तर हिराच आहे.
___ त्यावर मी आता एक उदाहरण देतो. आम्ही स्वत: एक झाड लावले असेल आणि नंतर जर आम्हालाच तिथे रेल्वे लाईन घालायची असेल आणि ते झाड रेल्वे लाईनच्या आड येत असेल म्हणून ते झाड कापायची वेळ आली, तर मी सांगेन की मी झाड लावले आहे, मी त्याला पाणी घातले आहे, तेव्हा आता तुम्ही रेल्वे लाईनीत बदला करा पण झाड कापायचे नाही. म्हणजे मी एकाद्या महाराजांच्या पाया पडलो, मग त्यांनी