________________
गुरु-शिष्य
परिणाम दिसेल. नाही तर त्याचा परिणाम कसा दिसेल? ज्या स्पष्टपतापूर्वक मी समजलो आणि ज्या स्पष्टीकरणामुळे मी सुटलो आहे, संपूर्णपणे सुटलो आहे, जो रस्ता मी आचरणात आणला तोच रस्ता मी तुम्हाला दाखवला आहे.
प्रश्नकर्ता : पण ही गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला कशी समजेल?
दादाश्री : बाहेरच्यांसाठी नाही. हे तर तुम्ही समजायचे. बाहेरच्यांना समजेल अशी ही गोष्ट नाही. ही तर ज्याच्या डोक्यात जितकी उतरेल तेवढीच उतरेल! सगळ्यांना कदाचित नाही पण समजणार. त्यांच्यात तितकी शक्ती हवी ना! पचवण्यासाठी शक्ती असली पाहिजे ना? या माणसांचा काही ठिकाणा नाही, डोक्याचा ठिकाणा नाही, मनाचा ठिकाणा नाही, जिथे-तिथे चिडतात, जिथे-तिथे भांडतात. ते तर पूर्वीचे मनुष्य होते स्थिरावलेले!
बाकी हे तर दुर्दशा झालेले लोक! येथे बॉस ओरडतो, बायको ओरडते. एखादीच व्यक्ती यातून वाचेल. बाकी, आता तर दुर्दशाच झालेली आहे! हल्ली लोक गुरूंकडे कशासाठी जातात? लालचूमुळे (प्रलोभनांमुळे) जातात की, 'माझे हे ठीक करून द्या, माझे असे होऊ द्या, गुरूंनी मझ्यावर थोडी कृपा करावी आणि माझे दिवस बदलावेत!'
प्रश्नकर्ता : गुरू करताना शिष्याकडे कोणते गुण असले पाहिजेत?
दादाश्री : अलीकडच्या शिष्यांजवळ चांगले गुण कसे असतील? आणि तेही या कलियुगात! बाकी शिष्य तर कोणाला म्हणायचे की त्याच्या गुरूंनी वेडेपणा केला तरी त्याची श्रद्धा तुटणार नाही, त्याला म्हणतात शिष्य! गुरूंनी वेडेपणा केला तरीही आपली श्रद्धा ढळणार नाही. शिष्य म्हणून हे आपले गुण म्हटले जातात असे होईल का तुमच्याकडून?
प्रश्नकर्ता : अजून तर असा प्रसंग उपस्थित झाला नाही. दादाश्री : तसे झाले तर काय कराल?
हो, गुरूंवर श्रद्धा ठेवाल तर अशी ठेवा की जी श्रद्धा ठेवल्यानंतर ढळता कामा नये. नाही तर सुरवातीपासूनच श्रद्धा ठेऊ नये, त्यात काय वाईट?