SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 84
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ गुरु-शिष्य सांगा, 'तू माझी गुरू, मी तुझा गुरू, चल ये बघू! उल्हास तर येईल ना ! तिचा सुद्धा उल्हास वाढेल. ज्याला पाहून उल्हास वाटणार नाही त्याला गुरू बनवण्यापेक्षा बायकोलाच गुरू बनवले तर काय वाईट ? कारण आत भगवंत बसले आहेत ! मग ती शिकलेली असो किंवा नसो, त्याची काहीच किंमत नाही ! ७३ म्हणजे चांगले गुरू मिळाले नाही, तर शेवटी बायकोलाही गुरू बनवा! कारण गुरूला विचारून चाललेले उत्तम ! विचारलेच नाही तर मग भटकत राहील. ‘तुझे काय म्हणणे आहे ? तू म्हणशील तसे करू' असे आपण विचारावे. आणि बायकोने नवऱ्यामध्ये गुरूस्थापना केली पाहिजे की, 'तुम्ही काय म्हणता, त्याप्रमाणे मी करीन, ' हे दुसरे गुरू - ढोंगी गुरू करण्यापेक्षा तर (हे चांगले) कारण घरात काही भानगड तर नाही ! म्हणून बायकोला गुरू मानून सुद्धा स्थापना करावी. परंतु एक तरी गुरू पाहिजे ना ! गुरू मिळाले तरी सुद्धा ? प्रश्नकर्ता : गुरूदेव म्हणून मी एका संतांचा स्वीकार केला आहे, तर आता मी जप करण्यासाठी त्यांचे नामस्मरण करण्याऐवजी दुसऱ्यांचे नामस्मरण करू शकतो का ? दादाश्री : आपल्याला जर उणीव वाटत असेल तर दुसऱ्यांचे नामस्मरण करा. पण उणीव वाटते का कधी? नाही. मग क्रोध-मान- लोभ होत नाहीत ना ? माया प्रश्नकर्ता : असे तर आत सगळे काही होते. दादाश्री : मग चिंता ? प्रश्नकर्ता : चिंता वाटते, पण थोडी ! दादाश्री : चिंता आहे मग ज्यांचे नाव घेण्याने चिंता होत असेल त्यांचे नामस्मरण करण्याचा अर्थच काय आहे ? मिनींगलेस ! क्रोध-मानमाया - लोभ होत असतील तर त्या नाम स्मरणचा काय उपयोग ? असे क्रोध-मान-माया-लोभ तर दुसऱ्यांना सुद्धा होतात आणि तुम्हाला सुद्धा होतात, म्हणजे तुमचे काम पूर्ण झाले नाही.
SR No.034334
Book TitleThe Guru and The Disciple Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year
Total Pages164
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy