________________
संपादकिय लौकिक जगात वडील-मुलगा, आई-मुलगा किंवा मुलगी, पती-पत्नी असे सर्व संबंध असतात. तसेच गुरू-शिष्य हा पण एक नाजूक संबंध आहे. गुरूंना समर्पित झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून परम विनयापर्यंत पोहोचून, गुरूआज्ञेप्रमाणे साधना करून सिद्धी प्राप्त करायची असते. परंतु खऱ्या गुरूची लक्षणे तसेच खऱ्या शिष्याची लक्षणे कशी असतात याचे सुंदर विवेचन येथे प्रस्तुत झाले आहे.
जगात गुरूच्या बाबतीत विविध मान्यता प्रचलित आहेत आणि अशा काळात यथार्थ गुरू बनवताना लोक संभ्रमात पडतात. येथे प्रश्नकर्त्यांद्वारे असे पेचात टाकणारे प्रश्न 'ज्ञानी पुरुषांना विचारले गेले आहेत आणि त्यांची समाधानकारक उत्तरे स्पष्टीकरणासह प्राप्त झाली आहेत.
ज्ञानी पुरुष' म्हणजे जगताच्या व्यावहारिक स्वरूपाचे तसेच वास्तविक विज्ञान स्वरुपाची ऑब्जरवेटरी! अशा ज्ञानी पुरुषाच्या श्रीमुखातून गुरूपद म्हणजे काय? अध्यात्मात गुरूची गरज आहे का? असेल तर ती किती? गुरूची लक्षणे कोणती असावीत? ते गुरूत्तम आहेत की लघुत्तम? गुरूकिल्ली सहीत आहेत का? गुरू लोभ, लालूच किंवा मोहामध्ये अडकले आहेत? लक्ष्मी, विषयविकार किंवा शिष्यांची भीक त्यांच्यात अजूनही आहे ? गुरूची निवड कशी करावी? कोणास गुरू बनवावे? गुरू किती बनवावेत? एक गुरू निवडल्यानंतर दुसऱ्या गुरूची निवड करता येते का? गुरू नालायक निघाले तर काय करावे? अशा प्रकारे गुरूपदाच्या जोखीमांपासून, शिष्यपद म्हणजे काय? शिष्य कसे असले पाहिजेत? आणि शिष्यपदाच्या सूक्ष्म जागृतीपर्यंतची संपूर्ण समज तसेच गुरूच्या कोणत्या व्यवहाराने स्वत:चे व शिष्याचे हित होईल आणि शिष्याने स्वत:च्या हितासाठी कुठल्या दृष्टीसह गुरूजवळ राहिले पाहिजे, तसेच शिष्याने गुरूपद कुठे स्थापित करावे की ज्यामुळे त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन ज्ञान परिणमित होईल आणि गुरूमध्ये कोणकोणते दोष असू नयेत की ज्यामुळे असे दोषरहित गुरू स्वत:च्या शिष्याचे हित करण्यास समर्थ बनतील. एकलव्यासारखी गुरूभक्ती या कलियुगात कुठून सापडेल? ज्ञानी पुरुषाने गुरू केले आहेत की नाही?